आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोटांचे ठसे न उमटणाऱ्यांच्या रेशनसाठी धावून येणार 'नॉमिनी'; शासननियुक्त नामांकित व्यक्तीवर जबाबदारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आधार कार्ड आहे. त्यामुळे आधारच्या सर्व्हरवर आपसूकच बोटांच्या ठशांची नोंदही झाली आहे. दरम्यानच्या काळात अनेक वर्षे लोटल्यामुळे बोटांच्या रेषा अस्पष्ट झाल्या. परिणामी रेशन खरेदी करण्याच्या पॉइंट आॅफ सेलवर (पॉस) संबंधितांची ओळख जुळत नाही. अशा वृद्धांच्या मदतीसाठी शासनाने 'नॉमिनी' नियुक्त केले असून, त्यांच्या आधारे संबंधितांना धान्य पुरवठा केला जात आहे. 


गावांतील नामांकित व्यक्तींच्या खांद्यावर नॉमिनीची जबाबदारी सोपवण्यात आली अाहे. त्यांनी ओळख पटवून दिल्यानंतरच संबंधित वृद्धांना धान्य दिले जाते. गावचे सरपंच, पोलिस पाटील, समाजधुरीण, ग्रामपंचायत सदस्य अशा मान्यवरांची यासाठी निवड करण्यात आली आहे. अर्थात संबंधित वृद्ध कार्डधारकांच्यावतीने नॉमीनीच्या बोटांचा ठसा उमटवूनच 'पॉस'ची प्रक्रिया पार पाडली जाते. अकोला जिल्ह्यात दीड लाखांवर रेशनकार्ड आहेत. १ हजार ६० दुकानांच्या माध्यमातून या कार्डधारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. यापैकी काही कार्डधारक जख्खड म्हातारे आहेत. त्यांचे रेशन कार्ड अंत्योदय आणि प्राधान्य गटातील असल्यामुळे त्यांना शासनातर्फे गहू, तांदूळ, साखरेचा पुरवठा केला जातो. पूर्वी हा पुरवठा पावत्या फाडून केला जायचा. हल्ली तो पॉस मशीनच्या साहाय्याने केला जातो. या मशीनवर बोटांच्या ठशांच्या आधारे रेशनकार्डधारकाला आपली ओळख पटवावी लागते. मात्र बोटांवरील रेषा अस्पष्ट असल्यामुळे वृद्धांच्या बोटांचे ठसे जुळत नाही आणि ठसे जुळत नाहीत म्हणून त्यांना धान्य दिले जाऊ शकत नाही. जिल्ह्यातही असे काही नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना धान्य दिले जाऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर नॉमीनीच्या आधारे त्यांना धान्य पुरवले जात आहे. 


२९६ नागरिकांसाठी झाला वापर 
बोटांच्या रेषा अस्पष्ट झाल्या. परिणामी रेशन खरेदीच्या पॉइंट आॅफ सेलवर (पॉस) त्यांची ओळख जुळत नाही. अशा वृद्धांच्या मदतीसाठी शासनाने नवीन उपक्रम सुरु केला आहे. बोटांचे ठसे स्पष्ट नसलेले काही वृद्ध पातूर तालुक्याचे रहिवासी आहेत. यंत्रणेच्या छाननीत हे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या तालुक्यातील २९६ नागरिकांना नॉमीनीच्या ठशांचा आधार घेऊन धान्य दिले. हा पर्याय वापरण्यापूर्वी त्या वृद्धांच्या वेगवेगळ्या बोटांचे ठसे पॉसवर उमटवले जातात. परंतु एकही न जुळल्यानेे शेवटी नॉमीनीचा वापर केला जातो.

बातम्या आणखी आहेत...