आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवरखेड परिसरात गारपीट; केळी,फळबागांचे नुकसान, विद्युत तारा पडून पुरवठा खंडित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवरखेड- हिवरखेड परिसरात १९ जून रोजी वादळी वारा, गारपिटीसह आलेल्या पावसामुळे परिसरातील केळी व फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडे कोसळली. विद्युत तारा पडून पुरवठा खंडीत झाला. वादळी वाऱ्याने घरांची पडझड होऊन घरावरची टिनपत्रे उडाली. 


अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. सुनील राऊत यांच्या शेतातील खोपडीवरील टीनपत्रे उडाल्यानेे कांद्याचे नुकसान झाले. गावातही फिरोज खाँ उस्मान खाँ मिस्त्री यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. परिसरातील काही झाडेही कोसळली असून, विद्युत तारा तुटल्या आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाले असून, गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. गावातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. 


या भागातील झाले नुकसान : हिवरखेड परिसरातील मोराडी, खंडाळा, सौंदळा, हिवरखेड भाग १, २, गोर्धा, सोनवाडी, तळेगाव, मालठाणा खुर्द, दीवाण झरी, चिचारी यासह परिसरातील केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. संत्रा, लिंबूचेही नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली. उभे पीक कापणीसाठी तयार असतानाच परिसरात वाऱ्यासह पाऊस झाला. काही भागात गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. 


बोरगावमंजू परिसरात पाऊस
परिसरात मंगळवारी वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रस्त्यावरच झाडे कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. परंतु, मंगळवारी १९ जूनला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अचानक वादळ, वारा सुटला. जोराचा पाऊस येऊन झाडांची पडझड झाली. स्टेशन रोडसह अन्वी मिर्झापूर रोडवर झाडे पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नंतर गावकऱ्यांच्या सहकार्याने रत्यावरील झाडे बाजुला करण्यात आले. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. 


पंचनाम्याचे दिले आदेश 
शेतकऱ्यांच्या फळबागांच्या झालेल्या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करून पंचनामा करण्याचे आदेश संबंधित तलाठी व अधिकाऱ्यांना दिले आहेत. 
- डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार, तेल्हारा. 

बातम्या आणखी आहेत...