आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेलच्या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांचा पुढाकार? राजकीय वातावरण तापणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - पटेल समाजाचे गुजरात येथील युवा नेते हार्दीक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत अकाेल्यात २३ मार्च राेजी शेतकरी व बेराेजगार युवकांच्या एल्गार मेळावा हाेणार अाहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. मेळावा स्वराज्य भवन येथे संध्याकाळी ६ वाजता हाेणार अाहे.


अकाेला जिल्हा राजकीय दृष्ट्या भाजपमय असून, सर्वच विराेधी पक्ष जिल्ह्यात पाय राेवण्यासाठी प्रयत्न करीत अाहेत. शेतकऱ्यांच्या अनेक अांदाेलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारिप-बमसंकडून पाठिंबा देण्यात येताे. डिसेंबर महिन्यात शेतकरी जागर मंचने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात केलेल्या अांदाेलनाला उपराेक्त सर्वच विराेध पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत नेतेही सहभागी झाले हाेते.


दरम्यान, अाता विदर्भ युथ फाेरमतर्फे शेतकरी व बेराेजगार युवकांच्या एल्गार मेळाव्याचे अायाेजन करण्यात अाले असून, त्यादृष्टीकाेनातून नियाेजन करण्यात येत अाहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नेते डाॅ. सुधीर ढाेणे हे राहणार अाहेत.

 

राेजगाराच्या संधीही अाटल्या: दाेन दशकांपासून जिल्हयात राजकीयदृष्टया भाजपचे वर्चस्व अाहे. सध्या तर न.प., मनपासह राज्य व केंद्रात भाजपचे सरकार अाहे. असे असतानाही जिल्ह्यात राेजगाराच्या संधी कमी हाेत अाहेत. माेठे उद्याेग तर बंदच झाले असून, असलेल्या उद्याेगांनाही घरघर लागली अाहे. टेक्सटाईल्स पार्कही अमरावती येथे हाेणार असून, दुसरा प्रकल्प खामगाव येथे सुरु हाेण्यासाठी हालचालीस प्रारंभ झाला अाहे. त्यामुळे या बेराेजगार युवकांच्या मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे अाहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...