आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - जिल्ह्यात शनिवारी रात्री व रविवारी दुपारी अवकाळी पावसाचे काही काळ जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अकाेला शहरातही रविवारी दुपारी काही वेळ जाेरदार सरी कोसळल्या. अकाेला व मूर्तिजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला.

 

अकाेल्यात १.२ तर मूर्तिजापूर तालुक्यात १ मि.मी. पावसाची नाेंद झाली.या पावसामुळे पिकांचे माेठे नुकसान झाल्याची माहिती पुढे अालेली नाही. मात्र अचानक अालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.दरम्यान,१२ फेब्रुवारी राेजी जिल्ह्यात गारपीट व मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते.अाता पुन्हा अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी धास्तावले अाहेत. हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली हाेती. तसा अहवाल, सावधानतेचा इशारा जिल्ह्यांना पाठवण्यात अाला हाेता.

बातम्या आणखी आहेत...