आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन पेटंट, 39 शोध निबंध घेणाऱ्या जव्वादचा सन्मान; आज मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी देशातील २५ युवकांत अकोल्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील जव्वाद पटेल या २३ वर्षीय तरुणाची निवड झाली आहे. त्याने वातावरणातील बाष्पीभवनातून पाणी निर्मिती करणारे यंत्र जसे ड्यू ड्रॉप व सेन्सर हेल्मेटची निर्मिती केली. त्याचे पेटंटही त्याच्या नावावर असून, त्याने आतापर्यंत ३९ शोधनिबंध सादर केले आहेत. जव्वाद हा सध्या हैदराबाद येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात बीटेकचे शिक्षण घेत आहे. 


जव्वादच्या संशोधनात्मक कार्याची दखल केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने घेत त्याची राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड केली. नोयडात १२ जानेवारीला भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जव्वादला पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...