आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Accident- एक्सप्रेस ट्रेनच्या धडकेने तीन महिला ठार, एक गंभीर जखमी, शेगावमधील दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलढाणा- शेगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळ ओलांडणा-या तीन महिलांचा चेन्नई जोधपूर एक्सप्रेच्या धडकेने मृत्य झाला. तर या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली

 

आज सकाळी भुसावळ- नरखेड पॅसेंजरने भुसावळ कडून अनेक भाविक दर्शनासाठी शेगावला आले . गाडी प्लॅटफार्म नंबर 1 वर थांबली व प्रवासी उतरुन निघाले.दादरवर गर्दी  झाल्याने काही प्रवासी रेल्वे रुळावरून प्लॅटफाॅर्म 2 वर जात होते , चेन्नई- जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस येत होती. याचवेळी सरिता विजय साबे (वय 30 रा. स्टेट बँकांच्या मागे नांदुरा), संगीता भानुदास (गोळे वय 40 रा अलमपूर ता नांदुरा), चांदबाई शिवहरी तिसरे (वय 45 रा अलमपूर ता नांदुरा) यांच्यासह एक महिला  ट्रेन खाली आल्यी या अपघातात तिघींचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...