आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर उलटल्याने शेकडो लिटर पेट्रोल गेले वाहून, पेट्रोल नेणाऱ्या जमावास पोलिसांनी बळाने पांगवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट - चोहोट्टा बाजार जवळील पळसोद फाटा येथे पेट्रोल व पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन त्यात पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. मंगळवार, २७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात जिवितहानी झाली नसली तरी शेकडो लिटर पेट्रोल वाहून गेले. दरम्यान, टँकरमधील पेट्रोल घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती.

 

गायगाव येथील हिंदुस्थान पेट्रोलियम डेपो येथून अकोटच्या दिशेने जात असलेल्या एमएच २०, एए ९९६१ क्रमांकाच्या टँकरचा पळसोद फाट्याजवळ स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या वेळी देवरी फाटा येथून पाणी भरून येत असलेल्या एमएच ३०, व्ही ६२७० क्रमांकाचा टँकर येत होता. अनियंत्रित झालेल्या पेट्रोल टँकरने पाण्याच्या टँकरला धडक दिली. त्यामुळे पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. उलटलेल्या टँकरमधून शेकडो लिटर पेट्रोल रस्त्यावर वाहून गेले. ही वार्ता पसरताच नागरिकांनी पळसोद फाट्यावर मोठी गर्दी केली होती. या वेळी काही नागरिकांनी टँकरमधील पेट्रोल चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जमावास पांगवले. या वेळी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. पेट्रोलच्या टँकरचा स्फोट होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना करण्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

बातम्या आणखी आहेत...