आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला- महाविद्यालयाकडून अ. जा. अ.ज. व इमाव विद्यार्थ्यांकडून अवैधरीत्या प्रवेश शुल्क वसूल करीत असल्याचा अाराेप करीत सम्यक विद्यार्थी अांदाेलनाच्या कार्यकर्त्यांनी थेट पावत्या दाखवत बुधवारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक सहाय्यक अायुक्त समाज कल्याणच्या कार्यालयात धाव घेत अांदाेलन केले. महािवद्यालयांकडून अवैध शुल्क वसुली हाेत असल्याचा अाराेप अांदाेलकांनी केला. यावर कार्यालय अधीक्षकांनी संबंधितांवर फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात अाल्याचे सांगितले. मात्र सहायक अायुक्त ए. एम. यावलीकर अमरावती येथे असल्याने त्यांचा संपर्क हाेत नसल्याने अांदाेलन अाक्रमक झाले. त्यांनी खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याचा पवित्रा घेतला. तेवढ्यात पोलिस इमारतीमध्ये दाखल झाले. याठिकाणी पोलिस व अांदाेलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर शहर कोतवाली पाेलिसांनी मध्यस्थी करीत उपायुक्तांशी संपर्क साधल्याने अांदाेलन तूर्तास मागे घेण्यात अाले. अाता गुरुवारी अांदाेलकच पोलिस तक्रार दाखल करणार अाहेत.
सीताबाई कला महाविद्यालयात येथील प्रवेश घेणा-या अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्काचे नियमबाह्य पद्धतीने वसुली केली जात आहे, असा अाराेप अांदाेलकांनी केला. याबाबत काही दिवसांपूर्वी भारिप बहुजन महासंघप्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे प्राचार्य सिकची यांची भेटही घेतली हाेती. दरम्यान ४ जुलैला अांदाेलकांनी समाज कल्याण विभागाचे सहायक अायुक्त ए.एम. यावलीकर यांच्या कक्षात धाव घेतली. मात्र यावलीकर उपस्थित नसल्याने अांदाेलकांनी इतर अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर तेथे सिटी काेतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर अांदाेलकांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भावना व्यक्त केल्या. या वेळी सम्यक विद्यार्थी अांदाेलनाचे विभागीय प्रमुख राजेंद्र पातोडे, सचिन शिराळे, नितेश किर्तक,अमोल शिरसाठ ,धीरज इंगळे, आकाश गवई,योगेश किर्तक, पवन गवई, सुमित भांबोरे, अक्षय खडसे, शिवा शिरसाठ, पिंटू वानखड़े, छोटू वानखड़े, शेखर इंगळे, लकी वानखड़े, हितेश जामनिक, आकाश सदांशिव,अक्षय गोपनारायन, अमोल सदांशिव,बंटी क्षीरसागर,राजकुमार दामोदर, रितेश किर्तक,सचिन डोंगरे, भागेश्री इंगळे, सुमित वाकोडे,आनंद खंडारे अादी उपस्थित हाेते.
...त्यामुळे झाला पोलिसांशी वाद
सहायक अायुक्त हजर नसल्याने आणि अवैध प्रवेश शुल्क वसुलीप्रकरणी कारवाई हाेत नसल्याने अांदाेलक अाक्रमक झाले. त्यांनी सहायक अायुक्तांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून खुर्ची कार्यालयाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. यासाठी काही कार्यकर्ते इमारतीबाहेर पडले आणि चपलांचा हार घेत कक्षाकडे निघाले. मात्र कक्षाच्या बाहेर (इमारतीच्या जिन्यात) साध्या वेशातील पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले आणि चपलांचा हार नेण्यास मज्जाव केला. परिणामी पोलिस आणि अांदाेलकांमध्ये वाद झाला. त्यामुळे पोलिसांची जादा कुमक मागवण्यात अाली आणि नंतर वाद मिटला.
ते अालेच नाहीत ?
सहायक अायुक्त ५ ते ५.३०वाजतापर्यंत अमरावतीवरुन येथे येतील, असे अांदाेलकांना सांगितले होते. त्यामुळे अांदाेलकांनी संध्याकाळी समाज कल्याणच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र ते अाले नाही. त्यामुळे अांदाेलकांनी उपायुक्तांशी संपर्क साधून सहायक अायुक्त अाले नसल्याचे सांगितले. ठाणेदारांशी संपर्क साधला असता त्यांनी सहाय्यक अायुक्त अाले नसल्याच्या वृत्ताला दुजाेरा दिला. त्यामुळे ५ जुलैला पोलिसात तक्रार देण्यात येईल, असे अांदाेलनाचे विभागीय प्रमुख राजेंद्र पाताेडेंनी सांगितले.
निरीक्षकांनी अशा केल्या शिफारसी
१) अांदाेलकांनी समाज कल्याण विभागाच्या निरीक्षकांकडे कारवाईची मागणी केली. यावर निरीक्षकांनी याबाबत कार्यवाहीसाठी सहायक अायुक्तांना टिप्पणी सादर केल्याचे सांगितले. ही टिप्पणी राजेंद्र पाताेडे यांनी वाचली. टिप्पणीत संबंधितांकडून प्रथम खुलासा मागवणे, समितीकडून चाैकशी करणे, असे मत व्यक्त करण्यात अाले हाेते.
२) उपरोक्त टिप्पणीवर अांदाेलकांनी अाक्षेप घेत पुराव्यादाखल शुल्क वसुलीच्या पावत्या िदल्यानंतरही फाैजदारी कारवाई का नाही, असा सवाल केला. त्यामुळे काही वेळाने निरीक्षकांनी अाणखी एक टिप्पणी तयार केली आणि त्यात फौजदारी कारवाई/शिस्तभंगाची कार्यवाही याेग्य वाटते, असे मत नोंदवले
अधीक्षक म्हणाले 'फौजदारी'ची शिफारस; अाज करणार पोलिसांकडे तक्रार
अवैध प्रवेश शुल्क वसुलीप्रकरणी सहाय्यक अायुक्तांच्या कक्षात अांदाेलन केले. या वेळी राजेंद्र पाताेडे, शहर काेतवालीचे ठाणेदार विलास पाटील व कार्यालय अधीक्षकांनी चर्चा केली.
चपलांचा हार ठेवला खुर्चीच्या खाली
अांदाेलकांनी चपलांचा हार सहायक अायुक्तांच्या खुर्चीच्या खाली ठेवला हाेता. अांदाेलक उपजिल्हधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर या हाराची विल्हेवाट लावण्यात अाली. नंतर सहाय्यक अायुक्तांचा कक्ष बंद करण्यात अाला.
२४०० ते २६०० रुपये हाेते वसुली
सध्या जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पाेहाेचली अाहे. मात्र महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्काचे २४०० ते ४६०० रुपये नियमबाह्य पद्धतीने वसुली केली जात आहे, असा अाराेप अांदाेलकांनी केला. वास्तविक शासन निर्णयाप्रमाणे अशा पद्धतीने शुल्क वसुली करता येत नाही, असे अांदाेलकांचे म्हणणे हाेते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.