आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • कलियुगात पोटच्या मुलाचे भयावह कृत्य...जमिनीसाठी वयोवृद्ध आईला ट्रॅक्टरसमोर फेकले A Son Threw His Mother In Front Of A Tractor In Washim

कलियुगात पोटच्या मुलाचे भयावह कृत्य...जमिनीसाठी वयोवृद्ध आईला ट्रॅक्टरसमोर फेकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशिम- पोटच्या मुलाने शेतजमिनीसाठी वयोवृद्ध आईला ट्रॅक्टरसमोर फेकून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मालेगाव (जि.वाशिम) तालुक्यातील मुंगळा येथे 21 जूनला ही धक्कादायक घटना घडली. दोन कुटुंबात जमिनीवरून झालेल्या वादातून पोटच्या मुलाने हे कृत्य केले आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, मुंगळा येथील राऊत आणि दळवी कुटुंबात शेत जमिनीवरून वाद सुरु होता. न्यायदंडाधिकारीने निर्णय राऊत कुटुंबाच्या बाजुने दिला. राऊत कुटुंबिय शेतात काम करत असताना दळवी कुटुंबातील सदस्य शेतात पोहोचले. जमिनीच्या वादावरून दोन्ही कुटुंबातील महिलांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दळवी कुटुंबातील एका सदस्याने आपल्या वयोवृद्ध आईला ट्रॅक्टरसमोर फेकले. तिला जिवे मारण्‍याचा प्रयत्न केला. वयोवद्ध आई आजारी आहे. मुलाचे कृत्य पाहून ती थरथरत होती, तरी देखील मुलाला तिच्यावर दया आली नाही. तो आईला जमिनीवर आपटत होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सोशल मीडियावर व्हायरल झालेले या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...