आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्हा परिषदेत एसीबीचा छापा, दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना लाच घेताना रंगेहात अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शिक्षक बिंदूनामावली प्रक्रिया यशस्वीरित्या राबवल्याने थेट जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत 15 दिवसांपूर्वीच सत्कार स्वीकारणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना मंगळवारी लाच स्वीकारताना लाचलूचत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी शिक्षिकेला रूजू करुन घेण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

 

 

कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने शिक्षण विभागात धाव घेतली. पंचासमक्ष कर्मचाऱ्याने स्वीकारालेल्या नोटांची पडताळणी व ओेळख परेड केली. खातरजमा होताच दोन्ही कर्मचाऱ्यांना एसीबीने ताब्यात घेतले.

 

कैलास वसुदेव मसने (वय-47, रा.मोठी उमरी, असोलकर वाडी, अकोला, पद-वरिष्ठ सहाय्यक) आणि रामप्रकाश आनंदराव गाडगे (वय-55,रा.गितानागर, अकोला) अशी एसीबीने अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने बिंदुनामावलीचा प्रस्ताव मागासकक्षाला सादर केला होता. मात्र कक्षाने कारवाई करुन प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर बिंदूनामावलीचा प्रस्ताव परिपूर्ण होण्यासाठी शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

 

22 जानेवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या शिक्षकांची शिक्षण विभागाने सेवा समाप्त केली. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील एका शिक्षिकेचाही समावेश होता. या कारवाईला शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले. आयुक्तांनी शिक्षण विभागाच्या कारवाईला स्थगिती दिली.

 

त्यानंतर संबंधित शिक्षिकेला पुन्हा रुजू करुन घेण्यासाठी आवश्यक त्या मदतीकरिता शिक्षण विभागातील त्या दोन कर्मचाऱ्यांनी एक हजार रुपयांची मागणी केली. याबाबत शिक्षिकेच्या पतीने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली आणि मंगळवारी सापळा रचत कैलास वसुदेव मसने आणि रामप्रकाश आनंदराव गाडगे यांना अटक केली.

 

पुढील स्लाइडवर पाहा... संबंधित घटनेचा व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...