आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगावमध्ये कार जळून खाक; 'त्याने' धाडस दाखवत विझवली आग, मोठा अनर्थ टळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- कृषी उत्पन्न बाजार समितीत पाण्याच्या एटीएम मशिनमध्ये आरओचे पाणी भरण्यासाठी आलेल्या गाडीत शॉटसर्किट झाल्याने जागेवर जळून खाक झाल्याची घटना घडली.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे एटीएम सुरु करण्यात आले आहे. या एटीएम मशीनमध्ये दररोज येथील सुटाळा बु.मधील सुरेश अग्रवाल हे आरओचे पाणी आणून भरतात. दरम्यान नेहमीप्रमाणे त्यांनी गाडीमध्ये  (एम.एच.28/जी/4158) एक हजार लिटरची आरओच्या पाण्याची टाकी भरुन आणली. ही टाकी या एटीएम मशीनमध्ये खाली करत असतांना कारमध्ये शॉर्टसर्किट होऊन कारने पेट घेतला. कारने पेट घेताच जवळपास असलेल्या नागरिकांनी एकच पळापळ केली. यावेळी रवी मोरे या सामाजिक कार्यकर्त्यांने तातडीने नगर पालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करून ही आग विझविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. ही आग विझवितांना रवि मोरे हा किरकोळ जखमी झाला. त्याने धाडस दाखवत कारला लागलेली आग विझवून पुढील अनर्थ टळला.

बातम्या आणखी आहेत...