आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपविरोधात काँग्रेसचा नागपूर-तुळजापूर रास्ता रोखो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी- राज्यात व केंद्रात भाजप सरकार सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाली असून भाजप सरकारच्या काळात दरोरज होणारी पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसने नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोखो आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध केला.

 

आंतरराष्ट्रीय दरात प्रचंड घसरण होऊनही पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने       सर्व सामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला भिडल्याने परिनामी जिवनाश्क वस्तूचे देखील भाव दररोज वाढत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी अजूनपर्यंत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कमी भावात तूर विक्री करावी लागत. पेट्रोल व डिझेल व महागाई विरोधात सोमवारी दुपारी बारा वाजता तालुका काॅग्रेस कमिटी व युवक काॅग्रेसच्या वतीने दुचाकीची अंत्ययात्रा काढून नागपूर- तुळजापूर महामार्गावर रास्ता रोखो करण्यात आला.

 

भाजप विरोधात काॅग्रेस केली घोषणाबाजी

मोदी सरकार किसान विरोधी, मोदी सरकारचा निषेध असो, मोदी सरकार हाय हाय, अशा घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... भाजपविरोधात काँग्रेसने नागपूर- तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...