आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • कर्जाचा डोंगर, दुबार पेरणीचं संकट.. तरुण शेतकऱ्याने स्वतःला पेट्रोलने जाळून घेतले Farmer Burned Self With Petrol In Yawatmal

कर्जाचा डोंगर, दुबार पेरणीचं संकट..यवतमाळ येथे शेतकऱ्याने स्वतःला पेट्रोलने जाळून घेतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- वणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या वांजरी येथील तरुण शेतकऱ्यासमोर कर्जाचा डोंगर आणि दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने स्वतःला शेतात पेट्रोलने जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी घडली.

 

शंकर बापूराव देऊळकर (वय-40) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव असून चार एकर शेतजमीवर शंकर कुटुंबाचा गाडा चालवीत होता. महागाईच्या काळात कुटूंबाच्या गरजा वाढल्याने मागील वर्षी पासून त्याने मकत्याने शेती करण्यास सुरुवात केली. मात्र मागील वर्षी बोंड अळीचा प्रकोप झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. यामुळे शंकर हा अगोदरच चिंतेत होता.त्याने मागील वर्षी झालेली नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी या वर्षी परत एका सहकारी  संस्थेतून कर्जाची उचल करत परत शेतीजमिनीची मशागत केली. लगेचच  पेरणीही केली. मात्र पावसाने दगा दिला . यामुळे  केलेली पेरणी जमिनीतच करपली आणि शंकर समोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.

 

आधीच कर्जाचा डोंगर असतांना दुबार पेरणी करावी कशी अशा चिंतेचा काहूर शंकरच्या मनात माजत असतांना घटनेच्या दिवशी रात्री जेवण करून तो गावातील मित्रांसोबत विचार करत बसला होता. रात्रभर मनात विचार घोळत होते. पहाटे शंकर शेतात गेला आणि तेथे जाऊन बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतले आणि स्वतःला जाळून घेतले. यात तो 90 टक्के भाजला गेला.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थानी शंकरच्या शेताकडे धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. त्याला तात्काळ वणीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूरला हलविण्यात आले. दरम्यान त्याचा वाटेतच मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी नीता आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...