आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • SUICIDE.. यवतमाळ येथील शेतकरी पुत्राची वेणी धरणात उडी घेऊन आत्महत्या Farmer Sons Suicide In Veni Dam At Karanjkhed Yawatmal

SUICIDE.. यवतमाळ येथील शेतकरी पुत्राची वेणी धरणात उडी घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महागाव- येथून जवळच असलेल्या करंजखेड येथील निखील अनिल भांगे (23) या शेतकरी पुत्राने वेणी येथील अधरपुस धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. आज (मंगळवार) सकाळी 11 वाजता ही घटना घडली. करंजखेड येथून दुचाकी घेऊन निखील भांगे सकाळी घराबाहेर निघाला होता. वेणी येथील अधर पुस धरणावर आपली दुचाकी उभी करून त्याने धरणात उडी घेतली.

 

धरणाच्या काठावर मासे पकडणाऱ्या मच्छीमारांच्या निदर्शनास ही बाब आली. धरणाच्या गेट जवळ पाण्याचा प्रचंड दाब असल्याने निखीलला वाचविण्याची  हिम्मत कुणीही केली नाही. या घटनेची माहिती करंजखेड येथे पोहचताच गावकऱ्यांनी वेणी प्रकल्पावर धाव घेतली. 2 तासाच्या मच्छिमारांच्या अथक परिश्रमानंतर निखील भांगे याचा मृतदेहच मच्छीमारांच्या हाती लागला.

 

निखिल हा मागील दोन दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे मित्र सांगत आहेत. परंतु त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळले नाही. या घटनेची माहिती उमरखेड/महागाव विधानसभेचे आमदार राजेंद्र नजरधने यांना कळताच त्यांनी थेट वेणी धरणावर धाव घेऊन घटनास्थळ गाठले व मृतकाच्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले. निखिल यांचे नांवाने पाच एकर जमीन असल्याची माहिती पुढे आली असून त्याच्या बॅंक खात्यावर थकीत कर्जाचीही नोंद असल्याचे मृतकाच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...