आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार...चिठ्ठी लिहून शेतकर्‍याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- ‘माझ्या आत्महत्येस मोदी सरकारच जबाबदार अाहे,’ अशी चिठ्ठी लिहून यवतमाळ जिल्ह्यातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने अात्महत्या केली. ही घटना घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे मंगळवारी सकाळी उघडकीस अाली. शंकर भाऊराव चायरे (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.   


चायरे यांच्या नावे ९ एकर जमीन अाहे. यंदा त्यांनी कापसाची लागवड केली हाेती. मात्र, बोंडअळीमुळे संपूर्ण पीक उद‌्ध्वस्त झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, मुलींच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा अादी प्रश्नांचा डाेंगर उभा राहिला. सरकारकडून नुकसानीची मदत मिळत नसल्यामुळेही ते वैफल्यग्रस्त झाले हाेते. अखेर मंगळवारी सकाळी त्यांनी शेतात जाऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश अाल्यानंतर विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. चायरे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार अाहे.  दरम्यान, शंकर यांच्या मुलीने माेदींवर कारवाई करण्याबाबत तक्रार घाटंजी पाेलिसात दिली अाहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... शेतकर्‍याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली सुसाइड नोट..

बातम्या आणखी आहेत...