आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात मराठा आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टके..आंदोलनस्थळीच वधु-वराचे लग्न!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (9 ऑगस्ट) क्रांती दिनी मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. अकोला जिल्ह्यातही सकाळपासून कडकडीत बंद पाळला जात आहे.

मात्र, अकोटमध्ये मराठा आंदोलनाचे एक वेगळे रुप पाहायला मिळाले. मराठा समाजाला आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टके ऐकायला मिळाले. आंदोलक वधू-वरांना आंदोलनस्थळी एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. 

 

मिळालेली माहिती अशी की, अकोट तालुक्यातील देऊळगाव येथील तेजस्विनी गावंडे हिचा विवाह आज गांधीग्रामच्या अभिमन्यू अढाव याच्यासोबत होता. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सदनमध्ये या विवाहाचे आयोजन  करण्‍यात आले होते. विवाहस्थळ‍ी दोन्हीकडील पाहुणेमंडळी उपस्थित होती. तेजस्विनी आणि अभिमन्यूसह दोन्हीकडील मंडळींनी लग्नाआधी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यातूनच पुढे आंदोलनस्थळीच लग्न लावण्याचा निर्णय दोन्हीकडील मंडळी आणि पाहुण्यांनी घेतला.

वधू-वर आणि पाहुणे मंडळी शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घोषणाही दिल्या. आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टके सुरु झाली. मराठा समाज आणि आंदोलकांच्या साक्षीने अभिमन्यू आणि तेजस्विनी वैवाहिक जीवनाच्या सूत्रात बांधले गेले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...