आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळा संपताच समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाचा शुभारंभ करणार; विनायक मेटेंची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव- महासागरात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच एका कंपनीसोबत करार झाला असून पावसाळा संपल्यावर शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक  अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिली.

 

ते म्हणाले की,  शिवस्मारकासोबत लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार आहे. पूर्वीच्या सरकारपेक्षा भाजप महायुतीच्या सरकारने सर्वात जास्त कर्ज माफी शेतकऱ्यांसाठी केली. यात ऑनलाइन पद्धतीने कर्जमाफीचे अर्ज भरून घेतल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला. गत चार वर्षांत वेळोवेळी विविध शेती पिकांना पीक विमा दिला. शेतकरी वर्गाला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देणारे हे पहिले सरकार आहे. फडणवीस  हे राज्याला दिशा देणारे कर्तृत्ववान नेतृत्व  असल्याची प्रशंसा सुद्धा त्यांनी या वेळी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील शिवशाहीचे राज्य स्थापनेच्या दृष्टीने शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, त्याचे विचारही आचरणात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...