आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी मनसे जिल्हा कार्यकारिणीत बदलाचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अकोला जिल्हा दौरा या महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी जिल्हाध्यक्षांसह काही पदांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याचे संकेत आहेत.

 

मनसे पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने हालचालींना जिल्हास्तराव वेग आलेला आहे. मध्यंतरी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विदर्भाचा दौरा केला त्यातून त्यांनी कल जाणून घेतला. अकोला पूर्व- पश्चिम, अकोट मतदारसंघाचे प्रमुख म्हणून पद रिक्त होते. तर, रामा उंबरकर यांच्याकडे बाळापूर, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. त्यामध्येही बदलाची शक्यता आहे. नवीन जिल्हाध्यक्षपदासाठी डॉ. शंकरराव वाकोडे, पंकज साबळे, राजेश काळे यांच्या नावाची चर्चा आहे. पूर्वी छावाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शंकरराव वाकोडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा प्रभार होता. आताही त्यांच्या नावाची चर्चा आहे. मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दामले यांना जिल्हाध्यक्षपदासाठी विचारणा झाली होती परंतु त्यांनी त्यास नकार दिल्याचे कळते. तर, अकोट भागातून रवींद्र फाटे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच, मनविसे जिल्हाध्यक्षपदासाठी भूषण भिरड, अरविंद शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे. शहर अध्यक्षपदासाठी राकेश शर्मा, ललित यावलकर यांची नावे आघाडीवर आहेत.

 

14 मे रोजी संभाजी महाराजांची जयंती आहे. त्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांना बोलावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. त्या कार्यक्रमापूर्वी पक्षाची रचना व्यवस्थित व्हावी, असा प्रयत्न असल्याचे संकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...