आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • अंगणात झोपलेल्या विधवेचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा दाखल Molestation Of Widow Women In Nandura Buldana

अंगणात झोपलेल्या विधवा महिलेचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरा- अंगणात झोपलेल्या एका चाळीस वर्षीय विधवा महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील बेलाड येथे 16 जून रोजी घडली. प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसापासून युवतींचे हरवणे, विनयभंग, फूस लावून पळवणे, महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे.

 

दोन दिवसांपूर्वी वडनेर भोलजी येथील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेची शाई न वाळत नाही तोच पूर्णा नदीचे काठावर वसलेल्या बेलाड येथील चाळीस वर्षीय विधवा महिला रात्री अंगणात झोपली होती. रात्री तीन वाजेच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्वर मुरलीधर साबे याने निद्रिस्त अवस्थेत असलेल्या विधवा महिलेच्या खाटजवळ जाऊन तिचा विनयभंग केला. प्रकरणी पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अरुण आगे यांच्या मार्गदर्शनाखाली नापोका प्रभाकर देवचे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...