आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • एकतर्फी प्रेम..लग्नाला नकार दिल्याने तरुणीच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले Striking Denying Marriage Girl Burned By Lover In Washim

एकतर्फी प्रेम..लग्नाला नकार दिल्याने त्याने तरुणीच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम- लग्न करण्यास नकार दिल्याने एका 18 वर्षीय तरुणीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 19 जूनला सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

 

अनसिंग पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी येथील आरोपी रवी भगवान भालेराव (21) याने गावातील १८ वर्षीय मुलीला 'तू माझ्याशी लग्न कर' असे म्हणत, आरोपीने मुलीच्या घरात प्रवेश केला. परंतु, 'मला माझ्या आई-वडिलांच्या संमतीने लग्न करावयाचे आहे', असे म्हणून पीडितेने त्याला नकार दिला. हा राग मनात धरून आरोपीने तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळले.

 

पीडितेच्या जबाबावरुन अनसिंग पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवि कलम 452, 307 प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीस ताब्यात घेतले. मुलीला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना पीडितेची प्राणज्योत मालवली. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची चर्चा परिसरात आहे. पुढील तपास अनसिंग ठाणेदार करीत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...