आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाने शिक्षा ठाेठावताच अासारामच्या आश्रमावर हल्ला, अाश्रम हटवण्याची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला -  अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी  जोधपूरच्या विशेष न्यायालयाने स्वयंघाेषित आध्यात्मिक गुरू अासारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा निर्णय कळताच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी  अकाेल्यातील पातूर रस्त्यावरील अासारामच्या अाश्रमावर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी अासारामच्या प्रतिमांची ताेडफाेड केली  अकोल्यातील हिंगणा परिसरात अाश्रम अाहे. अासारामचे भक्त या ठिकाणी शहर व परिसरातून नियमित येत असतात.  दरम्यान, बुधवारी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात  जोधपूरच्या विशेष न्यायालयाने आसारामला शिक्षा ठोठावल्याचे वृत्त येताच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रेम गावंडे यांच्या नेतृत्वात अाश्रमाकडे धाव घेतली.

 

त्यांनी अाश्रमातील साहित्याची विशेषतः अासारामच्या प्रतिमांची नासधूस केली. तेथे असलेल्या चाैकीदाराला किंवा अन्य व्यक्तींना मारहाण केली नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी काेणावरही कारवाई केली नव्हती.    अाश्रमाच्या अाधी  रस्त्यावर ‘अासारामजी बापू’ असे नाव असलेले माेठा फलक हाेता, ताेही खांबावर चढून फाडण्यात अाला.


अत्याचार करणाऱ्या अासारामला फाशीची शिक्षाच ठोठावणे अावश्यक हाेते, असे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे हाेते. बलात्कारी अासारामचा अाश्रम अकाेला जिल्ह्यात नकाेच, हा अाश्रम तातडीने हटवण्यात यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली अाहे.

 

नाशकात भक्तांनी फाेडला टाहाे

बलात्कार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावताच नाशिक शहरातील आश्रमात जमलेल्या भक्त परिवाराला रडू कोसळले. 

गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमात नियमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

 

बुधवारी काेर्टात सुनावणी असल्याने सकाळपासूनच भक्त परिवाराने मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या ठिकाणी भाविकांनी बापूच्या सुटकेसाठी नामस्मरणदेखील सुरू केले होते. मात्र, दुपारी न्यायालयाने शिक्षा सुनावल्याचे कळताच भाविकांच्या अश्रूंचा बांध फुटला. न्यायालयीन प्रक्रियेवर आपला विश्वास असून बापूची लवकरच सुटका होईल, अशाही भावना भाविकांनी व्यक्त केल्या. आश्रम परिसरात पोलिस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता.  

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. आसाराम बापूच्या आश्रमात तोडफोडीचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...