आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्तांवर रावते भडकले; म्हणाले, नुकसान भरपाई दारात येऊन द्यायची का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम- अवकाळी पाऊस आणि गारपिटमुळे बळीराजाचे कंबरडे मोडले असताना राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गारपिटग्रस्त शेतकर्‍याची समजूत काढण्याऐवजी त्यांना त्याला खडे बोल सुनावले आहे. 'गारपिटग्रस्तांसाठी मदत काल जाहीर झाली, म्हणजे तुमच्या दारात येऊन द्यायची का?' असा उलट सवालही रावते यांनी केला. इतकेच नाही तर 'जास्त बोलायचे नाही’, अशा शब्दात शेतकर्‍यांना दमही भरला.

 

रावते यांनी काल (शुक्रवार) गारपिटग्रस्त  भागाची पाहणी करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा दौरा केला. रिसोड तालुक्यातील नेतन्सा परिसरातील एका गारपिटग्रस्त शेतकर्‍याने त्यांच्याकडे आपल्या  व्यथा मांडल्या. परंतु शेतकर्‍याचे म्हणणे ऐकून न घेता रावते गारपिटग्रस्त शेतकर्‍यावरच भडकले. 'काही भान ठेवा जरा, मी  आलो ना तुमच्यासाठी, जास्त बोलायचे नाही' असे खडे बोल सुनावले. रावते यांच्या वक्तव्याने शेतकर्‍यांमध्ये नाराज पसरली आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...