आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा- जिल्हयातील तेरा तालुक्यांतर्गत १९५ गावांमध्ये २०१७-१८ मधील मंजूर जलयुक्तची कामे सुरु असून,ही कामे ३० टक्केपेक्षा अधिक झालेली आहेत. १०० टक्के काम ५० गावांमध्ये झाली आहेत. सर्वाधिक कामे खामगाव तालुक्यात २५ इतकी सुरु आहेत.
सिंचनक्षेत्र वाढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कृषी विभागाने जिल्हयातील १९५ गावांमध्ये कामे हाती घेतली आहे. यामधील ५० टक्के कामे ६१ गावात तर ५० ते ७९ टक्के कामे ५४ गावात तर ३० ते ४९ टक्के कामे ३० गावात झाली आहेत. नांदुरा तालुक्यात एकही काम शंभर टक्के झालेली नाही. विविध प्रकारची ही कामे सुरु असून या कामाचा उपयोग पाऊस पडल्यानंतर दिसून येणार आहे. प्रकल्पातील आराखड्यानुसार सुरु असलेल्या या कामांमध्ये प्रगती होऊन ती जलयुक्त व्हावी या दृष्टीने लक्ष घालणे जरुरी आहे. या जलयुक्त कामांमधील जलसाठयाचे प्रमाण निश्चित करण्याचे काम भूजल सर्वेक्षण करणार आहे.४९ टक्के काम झालेली गावांची संख्या या प्रमाणे बुलडाणा,खामगाव,संग्रामपूर व देऊळगाव राजा येथे प्रत्येकी दोन गावे,मोताळा,मलकापूर,मेहकर व सिंदखेड राजा येथे प्रत्येकी ४ तर शेगाव व नांदुरा येथे प्रत्येकी तीन गावांमधील कामे झाली आहे.
५० ते ७९ टक्के कामे झालेली तालुका निहाय गावांची संख्या या प्रमाणे बुलडाणा व मेहकर येथे प्रत्येकी दोन,चिखली व शेगाव प्रत्येकी एक,मलकापूर,जळगाव जामोद व देऊळगाव राजा प्रत्येकी ३,मोताळा,खामगाव व सिंदखेड राजा प्रत्येकी ७,संग्रामपूर ९,लोणार ५ व नांदुरा तालुक्यातील ४ गावात कामे सुरु आहेत. ८० ते ९९ टक्के कामे याप्रमाणे बुलडाणा व शेगाव तालुक्यातील एका गावात,चिखली व खामगाव तालुक्यातील ९, मोताळा तालुक्यातील ७, मलकापूर तालुक्यातील २, नांदुरा व सिंदखेड राजा तालुक्यातील प्रत्येकी ५, मेहकर व लाेणार तालुक्यातील प्रत्येकी ४, संग्रामपूर व देऊळगाव राजा तालुक्यातील प्रत्येकी ३ तर जळगाव जामोद तालुक्यातील ८ गावांमध्ये कामे सुरु आहेत. शंभर टक्के कामे झालेली गावांची संख्या अशी,बुलडाणा व जळगाव जामोद प्रत्येकी ४,चिखली व देऊळगाव राजा प्रत्येकी ३, मोताळा व सिंदखेड राजा प्रत्येकी ५,मलकापूर,शेगाव व लोणार तालुका प्रत्येकी २,खामगाव व मेहकर प्रत्येकी ७ कामे पुर्ण झाली आहे.
अशी आहे तालुका निहाय गावांची संख्या
बुलडाणा ९,चिखली १३, मोताळा २३, मलकापूर ११, खामगाव २५, शेगाव ७, नांदुरा १२, जळगाव जामोद १५, संग्रामपूर २०, मेहकर १७, लोणार ११, सिंदखेड राजा २१ व देऊळगाव राजा ११ गावांमध्ये जलयुक्तची कामे सुरु आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.