आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आज, सोमवारी येथे पार पडलेल्या मेळाव्याद्वारे ३१२ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त होणार अाहे. सातव चौक स्थित वैदेही विष्णू सराफ महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्थानिक पाच कंपन्यांसह इतर तीन कंपन्यांनी या मेळाव्यात बेरोजगारांच्या मुलाखती घेतल्या. त्यासाठी पाचशेवर विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित झाल्या होत्या. मुलाखत देणाऱ्यांपैकी ३१२ जणांना येत्या काही दिवसांत नियुक्तीपत्रे दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विशेष असे की शासनाने अलीकडेच सुरु केलेल्या छत्रपती राजाराम उद्योजकता योजनेचा अकोला जिल्ह्यातील हा पहिलाच मेळावा होता. दरम्यान तरूणांनी शिक्षणासोबतच प्रशिक्षण घेऊन कौशल्य निर्माण केल्यास त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला रोजगार व उद्योजगता विभागाचे विभागीय अधिकारी काळबांडे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे (मुलींचे ) प्राचार्य प्रमोद भंडारे, नगरसेवक हरिश अलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, वैदेही विष्णू सराफ महाविदयालयाचे संजय गोटफोडे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहाय्यक संचालक दत्ता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वैदेही विष्णू सराफ महाविदयालयाचे प्राचार्य व प्राध्यापक तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केद्रांचे अधिकारी व कर्मचारी आदिंनी प्रयत्न केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सरस्वती पूजनाने मेळाव्याचा शुभारंभ झाला. १९ वर्षाखालील क्रिकेट चमूत भारताचे प्रतिनिधीत्व करणा-या आदित्य कैलास ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देवून यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.