आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगावच्या शाळकरी विद्यार्थ्याने अपहरणाचा डाव लावला उधळून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- येथील दंडे स्वामी मंदिराजवळील रहिवासी तथा नॅशनल शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचे १६ जुलै रोजी दुपारी अज्ञात इसमांनी अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान अपहृत विद्यार्थ्याने एकाच्या हाताला चावा घेवून त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. याप्रकरणी आज १७ जुलै रोजी विद्यार्थ्यासह त्याच्या पालकाने पोलिस ठाण्यात धाव घेवून हा प्रकार पोलिसांना सांगितला. 


नॅशनल शाळेतील विद्यार्थी गौरव सुधीर एकडे हा दुपारी स्थानिक एकबोटे चौकातून नेहमी प्रमाणे सायकलने खासगी शिकवणीला जात होता. दरम्यान त्याला सिल्व्हर कलरच्या ओमनीमधून आलेल्या काही व्यक्तींनी गाडीत डांबण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने तेथेच सायकल व दप्तर टाकून पळ काढत सिंधी कॉलनीतील मित्राकडे गेला. परंतु त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दोघांनी त्याला पकडून गाडीत टाकले. नांदुरा येथे आल्यानंतर त्याला शुद्ध आली. त्यावेळी गाडीमध्ये दोघे जण बसलेले होते. त्याने प्रसंगावधान राखून एकाच्या हाताला चावा घेवून तेथून पळ काढून जवळच असलेल्या एका बँकेत आश्रय घेतला. त्यानंतर ही सर्व घटना बँकेच्या चौकीदारास सांगितली. त्यावरून चौकीदाराने त्याच्या पालकाला फोन करून या घटनेची माहिती दिली. दरम्यान, आज गौरव व त्याच्या वडिलांनी पाेलिस ठाण्यात धाव घेतली. वृत्त लिहिपर्यत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणातील संपूर्ण तथ्य हे पोलिस चौकशीनंतर समोर येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...