आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षीय मुलीला दाखवले चॉकलेटचे आमिष, गावाच्या शिवारात नेऊन केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामपूर- चॉकलेटचे आमिष दाखवून एका चार वर्षीय मुलीचा अपहरणाचा प्रयत्न झाला. परंतु मुलगी रडू लागल्याने व आपले पितळ उघडे पडणार या भीतीने अपहरणकर्त्याने मुलीला सोडून दिले. ही घटना १२ एप्रिल रोजी दुपारी वरवट बकाल येथील ग्रामपंचायतजवळ घडली. वरवट बकाल येथील मजूर कुटुंबातील शेख बिस्मिल्ला यांची मुलगी इफराबी ही दुपारी ग्रामपंचायत जवळ खेळत होती. एवढ्यात एका अज्ञात इसमाने चॉकलेटचे आमिष दाखवून तुला तुझ्या वडिलांनी बोलावले आहे, असे म्हणून तिला ग्रामपंचायत समोरून पळवून नेले. परंतु रस्त्याने जात असताना अब्बू कहा है, असे म्हणून ती रडू लागली. त्यामुळे अपहरण करणाऱ्या अज्ञात इसमाने तिला चापटांनी मारहाण करून पांडव नदीतील एका खड्ड्यात सोडून घटना स्थळावरून पलायन केले. 


दरम्यान नदी पात्रात मुलगी रडत असल्याचा आवाज येत असल्याने एका दुचाकीस्वाराने आपली मोटार सायकल नदी पुलावर थांबवली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेवून त्या मुलीची विचारपूस केली. वरवट बकाल येथील ऑटो चालक आशिक कुरेशीने घटना स्थळी धाव घेतली. मुलीची ओळख पटताच त्याने तिला घरी पोहोचवून दिले. 

बातम्या आणखी आहेत...