आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खत्री हत्याकांडामधील १८ जणांची साक्ष पूर्ण; आराेपींची साक्ष ११ जुलैला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- बहुचर्चित किशाेर खत्री हत्याकांड प्रकरणी गुरुवारी (ता.२८) जिल्हा सत्र न्यायालयात मृतकाचे मित्र निकेश गुप्ता आणि मृतकाचा मुलगा मयूर खत्री या दाेघांची साक्ष तसेच आराेपीच्या वकिलांतर्फे प्रतिपरिक्षण करण्यात आले. दाेघांच्या साक्षीनंतर आराेपीची साक्ष ११ जुलै राेजी हाेणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात १८ जणांची साक्ष नाेेंदविण्यात आली आहे. 


व्यावसायिक किशाेर खत्री यांची जुने शहरातील साेमठाणा परिसरात ३ नाेव्हेंबर २०१५ राेजी हत्या करण्यात आली हाेती. या प्रकरणी दिलीप खत्री यांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी रणजितसिंग चुंगडे, जस्सी ऊर्फ जसवंतसिंह चव्हाण, रुपेश चंदेल, राजू मेहरे यांना अटक केली हाेती. या चौघांविरोधात जुने शहर पोलिस ठाण्यात भादaंविच्या कलम ३०२,३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हापासून चारही आरोपी कारागृहात आहेत. जुने शहर पाेलिस ठाण्याचे तत्कालीन पाेलिस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनात पाेलिस उपनिरीक्षक संताेष केदासे यांनी प्रकरणाची तपासणी करत न्यायालयात दाेषाराेपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. जाधव यांच्या न्यायालयामध्ये सुरु आहे. आतापर्यंत या प्रकरणात १८ जणांची साक्ष नाेेंदविण्यात आली. बुधवारी (ता.२७) सरकार पक्षातर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांनी दाेन साक्षीदारांना हजर करण्याची परवानगी घेतली हाेती. न्यायालयाने त्यांची परवानगी मान्य केल्यानंतर गुरुवारी दाेन्ही साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. या प्रकरणी आराेपीच्या साक्षीनंतर २५ जानेवारी राेजी दाेन्ही पक्षाची साक्ष घेण्यात येईल. त्यानंतर या खटल्याची सुनावणी करण्यात येईल. आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट दिलदार खान हे काम पाहत आहेत. या बहुचर्चित हत्याकांडाच्या निकालाकडे संपूर्ण अकोलावासीयांचे लक्ष लागून आहे. 

बातम्या आणखी आहेत...