आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९० फूट खोल कोरड्या विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला दिले जीवदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट- साधारण ९० फूट खोल कोरड्या विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून जीवदान देण्यात आले आहे. अकोट तालुक्यातील रुईखेड शिवारातील एका विहिरीत बिबट्या बुधवारी ४ जुलै रोजी पडला. हा प्रकार काही ग्रामस्थांना लक्षात आल्यावर त्यांनी वनविभागाला माहिती दिली. दरम्यान वनविभागाने अनेक तास अथक परिश्रम घेऊन बिबट्याला गुरुवार ५ जुलै रोजी बाहेर काढले. दरम्यान, हा बिबट्याला अकोट वनजीन्य विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. 


रुईखेड शिवारातील गट क्रमांक २५ मधील नामदेव ठोसर यांच्या शेतातील विहिरीत शिकार फस्त केलेला बिबट्या पडला. विहिरीत पाणी नव्हते, विहिरीतून आवाज ऐकू येत असल्याने काही शेतकरी विहिरीकडे गेले. त्यामध्ये बिबट असल्याचे दिसून आल्यावर त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. अकोला वनविभाग, अकोट वन्यजीव, तसेच अमरावती येथील रेस्क्यू पथक, अकोट ग्रामीण पोलिस तत्काळ दाखल झाले. सुमारे ९० फूट खोल असलेल्या विहिरीतून बिबट्याला बाहेर काढणे खूप कठीण काम होते. पथकातील फिरोज खान व वीरेंद्र उज्जेनकर हे जिवाची पर्वा न करता विहिरीत उतरले. फिरोज खान यांनी बिबट्याला अचूक गोळी मारून बेशुद्ध केले. त्यानंतर मोठी कसरत करत बिबट्याला बाहेर काढले. त्याला अकोटच्या कार्यालयात ठेवले असून, उपचार झाल्यानंतर जंगलात सोडणार आहेत. या कामात ग्रामस्थांची मोलाची भूमिका होती. 

बातम्या आणखी आहेत...