आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात विक्रमी पावसानंतरही प्रकल्पात मोजका पाणीसाठा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मुसळधार पावसाने शुक्रवारी नागपूरला झोडपून काढले. सहा तासात २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. पश्चिम विदर्भात मुसळधार नाही तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र विदर्भातील धरणक्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे धरणे मात्र कोरडीच राहिली आहे. 


अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा धरण हा मोठा प्रकल्प तर शहानूर (३१.७५ टक्के), चंद्रभागा (३२.७३ टक्के), सपन (३१.५० टक्के)आणि पूर्णा (३०.३७ टक्के)हे चार मध्यम प्रकल्प आहेत. जिल्ह्यात १ जूनपासून ते ७ जुलैपर्यंत एकूण २०८ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी या मुख्य प्रकल्पांच्या एकूण पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नाही. या पाचही जलाशयांमध्ये ३९.०६ टक्केच जलसाठा आहे. ही टक्केवारी या चारही जलाशयांच्या एकूण क्षमतेच्या तुलनेत ३१.८४ टक्के एवढी आहे. 


मुंबईत मुसळधार, आणखी पावसाचा इशारा 
सलग दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने रविवारीही मुंबईला झोडपून काढले. दुपारी अडीचपर्यंत कुलाबा येथे ११२ मिमी तर सांताक्रूझ ३७.२ मिमी पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासांत मुंबई , ठाणे, पालघर अाणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली अाहे. 


अमरावतीत ४६ लघू प्रकल्प असून या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या ९.११ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, मोर्णा व उमा या तिन्ही प्रकल्पात तर फारच नगण्य पाणीसाठा असून येथे अनुक्रमे १.०९, २.८६ व १.२३ टक्केच पाणी शिल्लक असल्यामुळे चिंताजनक परिस्थिती आहे. 


अमरावती विभागात पाऊस पडला पण धरणे कोरडीच 
विभागातील अमरावतीसह अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा या पाचही जिल्ह्यात आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही २४ मध्यम जल प्रकल्प कोरडेच आहेत. विभागात १ जूनपासून १६२.९७ मि.मी.पाऊस झाल्यानंतरही या प्रकल्पांमध्ये ७ जुलै रोजी एकूण २३.२३ टक्केच जलसाठा शिल्लक असल्यामुळे विभागात आणखी पावसाची आवश्यकता आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी जर जोरदार पाऊस झाला तरच मध्यम प्रकल्प भरतात त्यामुळे मध्यप्रदेशात पाऊस होणेही जिल्ह्यातील पाणीसाठा वाढण्यासाठी आवश्यक अाहे. 


नागपुरातील १८ प्रकल्पांत केवळ २१ टक्केच साठा 
- नागपूर विभागात १८ मोठे प्रकल्प आहेत. त्याची एकूण साठवणूक क्षमता २९६४.४३ दलघमी इतकी असून ७ जुलैपर्यंत यात ६४२.१२ दलघमी (२१.६६%) इतकाच पाणीसाठा. गोसेखुर्द-वडगाव ही धरणे मात्र भरली अाहेत. 
- अमरावती िवभागात २४ मध्यम प्रकल्प आहेत. त्यात ८ जुलैला २५.२७ टक्के तर २०१७-१८ मध्ये २५.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. िवभागात ४०९ मायनर प्रकल्प आहेत. त्यात आजच्या तारखेला १८.७३ टक्के जलसाठा अाहे. तर मागील वर्षी याच तारखेला १५.४४ पाणीसाठा होता. 

बातम्या आणखी आहेत...