आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवस करा अन्नत्याग; अमर हबीब यांचे अावाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- शेतकऱ्यांबाबत सहवेदना व्यक्त करण्यासाठी सोमवार १९ मार्च राेजी एक दिवस उपोषण-अन्न त्याग करण्याचे अावाहन किसान पुत्र अांदाेलनाचे अमर हबीब यांनी केले अाहे. हे उपोषण प्रत्येक किसानपुत्राने आणि पुत्रीने करावे. उपोषण सार्वजनिक ठिकाणी बसून करता येत नसल्यास प्रत्येकाने अापले नियमित काम करतानाही अापण उपोषण करु शकताे, असे हबीब यांचे म्हणणे अाहे. 


१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांच्या कुटुंबाने आत्महत्या केली. त्यानंतर गत ३२ वर्षात राेज शेतकरी मृत्यूला कवटाळत अाहे. सरकारे बदलली; पण शेतकऱ्यांचे दुःख कमी झालेले नाही. सरकारी धाेरणे बदलणे नागरिकांच्या हातात नसले तरी शेतकऱ्यांबाबत सहवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवस अन्न त्याग करण्याचे अावाहन अमर हबीब यांनी केले अाहे. 


या एक दिवसाच्या अन्न त्याग आंदोलन उपाेषणाने सरकार बधणार नसले, तरी देशातील प्रत्येक नागरिकांची शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी अधिक बळकट हाेण्यासाठी हे उपोषण आंदोलन करावे, असे अमर हबीब यांचे म्हणणे अाहे. 

बातम्या आणखी आहेत...