आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्लखांब केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतला दत्तक; प्राचीनक्रीडा प्रकाराला मिळणार प्रतिष्ठा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मल्लखांब या देशातील प्राचीन व शरीर पिळदार बनवणाऱ्या खेळाला इतर सर्वच खेळांचे पूरक मानले जाते. त्यामुळे या खेळाचा केंद्र शासनाने दत्तक घेऊन एक भारत श्रेष्ठ भारत अभियानात समावेश केला अाहे. मल्लखांबच्या प्रचार, प्रसारासोबतच राष्ट्रीय पातळीवर स्पर्धांचे आयोजन, प्रदर्शन करण्याची जबाबदारीही केंद्र सरकारने स्वीकारली असून आवश्यक सुविधा व िनधी देण्याची घोषणा नुकतीच केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केली आहे.


मल्लखांबचे प्रदर्शन २०२० च्या टोकियो आॅलिम्पिक उद््घाटन समारंभात होणार असून यासाठीही तयारी सुरू झाली आहे. याद्वारे मल्लखांबला नव्याने आंतरराष्ट्रीय ओळख िमळेल. देशातील हा प्राचीन खेळ आता सर्वच राज्यांमध्ये खेळला जाईल. यासोबतच विदेशातही खेळाडू त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करतील, अशी माहिती भारतीय मल्लखांब महासंघाचे अध्यक्ष डाॅ. रमेश इंडोलिया यांनी िदली.


 महासंघाद्वारे मल्लखांब फेडरेशन चषक, प्रौढांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा व वर्ल्ड चॅम्पियनशीप देशातील कोणत्याही शहरांमध्ये आयोजित केले जाऊ शकते. विशेषत: ज्या भागात खेळांचा प्रचार, प्रसार झाला नाही, अशा ठिकाणी खेळांचा स्तर उंचावण्यासोबतच खेळाची आवड िनर्माण करण्यासाठी मल्लखांबचा आधार घेतला जाणार असल्याचेही डाॅ. इंडोलिया यांनी सांगितले.


राज्यातील प्राचीन खेळ : मल्लखांब हा शिवशाही व पेशवाईमध्ये  विकसित झाला. त्याकाळी मल्लखांबवर शरीर मजबूत करण्यासाठी कसरती केल्या जात. राज्यात ३० जिल्ह्यांमध्ये हा खेळ चांगलाच रुजला आहे. तसेच शालेय व संघटनेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत हजारो खेळाडू सहभागी होत असतात. मात्र अजूनही ग्रामीण भागात मल्लखांबने हवी तशी पकड िमळवली नसल्याने या भागात मल्लखांबचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केंद्र सरकार सर्व सुविधा देणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हा खेळ लोकप्रिय होऊन उत्तम खेळाडू िमळतील. उत्तम मल्लखांबपटूंना इतर खेळांचेही प्रशिक्षण देता येईल, अशी माहिती राज्यातील साई केंद्राचे एकमेव मल्लखांब प्रशिक्षक प्रा. विलास दलाल यांनी िदली.

प्रमाणबद्ध शरीर घडवण्यास उपयुक्त खेळ

मल्लखांबपटू हा भविष्यात उत्कृष्ट जिम्नॅस्ट, कुस्तीपटू, कबड्डीपटू, अॅथलिट बनू शकतो. तसेच या खेळाद्वारे इतरही खेळांना सुरुवात करून यश मिळवता येते. त्यामुळे हा खेळ केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दत्तक  घेतल्याचे भारतीय मल्लखांब महासंघाचे अध्यक्ष डाॅ. रमेश इंडोलिया म्हणाले. 

 

 

सर्वच केंद्रांवर मूलभूत सोयी

क्रीडा प्राधिकरणाच्या सर्वच केंद्रांवर मल्लखांबसाठी मूलभूत सोयी असतील. यादृष्टीने अमरावती (श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ) हे देशातील पहिले असे शहर आहे, जेथे देशात सर्वप्रथम भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मल्लखांब केंद्र सुरू केले. आजवर नेहरू स्टेिडयम, इंिदरा गांधी स्टेिडयमसह देशातील स्टेिडयममध्ये मल्लखांबसाठी जागा आरक्षित जागा नव्हती. मात्र आता  सर्व स्टेिडयम्समध्ये आरक्षित जागा राहणार आहे. तेथे मल्लखांबचे प्रशिक्षणही दिले जाईल.

 

शिवछत्रपती पुरस्कार मल्लखांबनेच दिला

मल्लखांबने राज्यात शिवछत्रपती पुरस्कार विजेते घडवले. मात्र प्रतिष्ठेचा पुरस्कार विजेता मल्लखांबपटू घडला नाही. खेळाचा ५ टक्के आरक्षणात समावेश आहे. येत्या काही िदवसांत १० वी, १२ वीत ग्रेस गुणांसाठीही खेळाचा समावेश होणार असल्याचे सहायक क्रीडा संचालक सुधीर मोरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...