आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता अपघातात मामा-भाचा ठार, अज्ञात वाहनाने चिरडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर - बुलडाणा येथील लग्न ओटापून दुचाकीने अकोल्याकडे जाणाऱ्या मामा भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देऊन चिरडले. यात मामाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर भाचा उपचारादरम्यान दगावला.ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बाळापूर ते तरोडा दरम्यान सोमवारी १९ फेब्रुवारीला दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. अजय गंगाधर मल्याळकर ( ३८रा.माळीपुरा अकोला ) व किशोर मनोहर नांदे (५५ रा.नागपूर )अशी मृतांची नावे आहेत.

 

अकोला येथील माळीपुरा भागातील रहिवासी अजय मल्याळकर व नागपूर येथील किशोर नांदे हे दोघे दुचाकी क्रं. एम. एच. ३० व्ही. १४०० ने बुलडाणा येथून अकोल्याकडे येत होते. बाळापूर आणि खामगाव तालुक्याच्या सिमारेषेनजीक पिवळा नाल्याजवळ अज्ञात कंटेनरने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये किशोर नांदे हे जागीच ठार झाले तर अजय माळेकर हे गंभीर जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...