आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रसंतांच्या साहित्याबाबत फौजदारी दाखल करण्यासाठीची बैठक निष्फळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा- राष्ट्रसंताच्या साहित्यात फेरबदल करणारे व सदर साहित्य प्रकाशित करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी दाखल करण्यासाठी आयोजित बैठकीत कोणताच निर्णय न झाल्याने दोन तास चाललेली चर्चा मंगळवारी निष्फळ ठरली. 


राष्ट्रसंताच्या साहित्यात फेरबदल केला जात असल्याने महाराजांचे साहित्य प्रकाशन व विक्री करणाऱ्यांवर फौजदारी व न्यायलयीन खटला दाखल करण्याबाबत नोटीस अखील भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाने गुरूदेव या मासिकात प्रकाशित केली होती. त्यामुळे गुरूकुंज मोझरी आश्रमात श्री भुवैकुंठ अध्यात्म गुरूकुल संस्थेच्यावतीने याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 


अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ आणि श्री भुवैकुंठ अध्यात्म गुरूकुल या दोन संस्थेमधील गुरूदेव भक्तांमध्ये मतभेद असल्याचे जाहिर आहे. तरीही आज आयोजित बैठकीला सर्व गुरूदेव भक्त मतभेद विसरून बैठकीला उपस्थित राहिले. बैठकीत राष्ट्रसंताचे साहित्य चोरी या विषयावर सुमारे दोन तास चर्चा झाली. परंतु या चर्चेत एकाही मुद्द्यावर सहमती न झाल्याने चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे बाहेर गावावरून आलेले तरून गुरूदेव भक्त व प्रचारकांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रसंतांची ग्रामगिता, भजने, सुविचार, श्लोक, पोवाडे, भाषने, लेख, पत्र, ग्रंथ, अशा अनेक साहित्यात फेरबदल झाल्याचे गुरूदेव सेवा मंडळाचे म्हणने आहे. त्यामुळे असे जर कुणी फेरबदल करीत असेल तर त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा संस्थेने गुुरुदेव मासिकातून दिला होता. त्यामुळे अनेक गुरूदेव भक्तांची झोप उडाली होती. या इशाऱ्यामुळे संभ्रम निर्माण झाले होते. सदर संभ्रम दूर करण्यासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत अनेकांनी आपले मुद्दे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडले. त्या प्रश्नांची उतरे संस्थेच्या पदाधिकारी यांनी दिली.गुरूदेव मासिकात छापली गेलेली सूचना ही न्यायालयीन भाषेत व स्पष्टपणे नसल्याने काही प्रचारकांनी आक्षेप नोंदवला. त्या आक्षेपाला उत्तर देताना पदाधिकारी म्हणाले, ही प्रक्रिया न्यायालयीन असल्याने ते तसे छापावे लागले. साहित्यात फेरबदल करणा-या कीती लोकांवर कारवाई केली असा प्रश्न चर्चत घेतला असता संबंधीत लोकांना नोटिसी व पत्र व्यवहार केल्याचे उत्तर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. 


दरम्यान महाराजांचे साहित्य संस्था व प्रकाशन विभाग उपलब्ध करून देत नसल्याची खंत गुरूदेव भक्तांनी व्यक्त केली. मात्र या प्रश्नावर सेवा मंडळाने कुठलेही आश्वासन दिले नाही. तसेच समाधी परीसरातील असलेल्या हनुमानाची मूर्ती हटवावी अशी मागणी होती. त्यावर फक्त हास्यास्पद चर्चा करण्यात काहीजण व्यस्त झाल्याचे दिसून आले. या बैठकीला बाहेर गावुन आलेले गुरूदेव भक्त यांनाही काही बाजु मांडायच्या होत्या. परंतु चर्चा फक्त चर्चाच होत असल्याने त्यांनीही काही मुद्दे मांडायला नकार दिला. त्यामुळे चर्चेेत ठोस काही निर्णय न झाल्याने आगामी काळातही अशाच चर्चा घेऊन दोन संस्था मधील मतभेद विसरून एक मेकांचे पाय न ओढता, एकमेकांचे हात धरून महाराजांचा प्रचार करण्याचा मिश्किल सल्ला संस्थेचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ यांनी दिला. चर्चेला श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, सर्वाधिकारी प्रकाश वाघ,डाँ राजाराम बोथे,सुनिल देशमुख, घनश्याम पिकले, दिलीप कोहळे इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर दुसऱ्या बाजुने रवी मानव संचालन भु वैकुंठ अध्यात्म गुरूकुल, मनोहर साबळे, ज्ञानेश्वर रक्षक, डि एन लाखे, अमर वानखडे,सौ छाया रवी मानव, सचिन राऊत, राहुल देवघरे, संकेत काळे, आदि उपस्थित होते. 


केलेल्या फेरबदलावर सर्वच गप्प
गुरूदेव सेवा मंडळाचे माजी संचालन सुब्बाराव यांनी एका भजनात फेरबदल केल्याचा आरोप रवी मानव यांनी केला होता. परंतु चर्चे दरम्यान त्यांनी सुब्बाराव यांच्या बद्दल चर्चाच झाली नाही 

बातम्या आणखी आहेत...