आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोन महिन्याची गर्भधारणा झाल्याचे समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आजीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याने तिला गर्भधारणा झाली. या प्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल केला. मोठी उमरी येथे आजीकडे दोन महिन्यापूर्वी मुलगी आली होती. आजीच्या शेजारी राहणाऱ्या एका युवकाने तिच्यावर अतिप्रसंग गेला. त्यानंतर मुलगी तिच्या मावशीकडे मुंबई (वाशी) येथे गेली. 


मावशीने तिला रुग्णालयात नेले असता ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर मावशीला धक्काच बसला. तिने मुलीला विचारपूस केल्यानंतर तिने दुष्कर्माची माहीती दिली. आरोपीने तिला कुणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुलीच्या मावशीने तत्काळ एनआरआय सागरी किनारा पोलिस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी मुलीची तक्रार घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला व पुढील तपासासाठी गुन्हा सिव्हिल लाइन्स पोलिसांकडे वर्ग केला. 

बातम्या आणखी आहेत...