आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​विधवा महिलेवर घरात घुसून जबरदस्ती, चाकूचा धाक दाखवून केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विधवा महिला घरात एकटी असताना पळसो बढे येथील अमोल दादाराव शिंदे महिलेच्या घरात घूसला. त्याने विनयभंग करून तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला. विरोध केला तर महिलेसह मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पतीच्या निधनानंतर ती माहेरी मुलांसह राहत होती. शेतीकामासाठी महिला अमोल दादाराव शिंदेकडे जात होती. त्यामुळे महिलेची त्याच्याशी ओळख होती. मात्र महिला अकोल्यात राहायला आली. त्यानंतर आरोपी हा महिलेच्या घरी आला. त्याने विनयभंग केला व बळजबरीचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडीचा प्रयत्न केला असता त्याने चाकू दाखवून जीवे मारण्याचा व मुलांना मारण्याची धमकी दिली, महिलेच्या आरोपावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
बातम्या आणखी आहेत...