आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकची समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक; अपघातात मायलेकी ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार दोघी मायलेकी ठार झाल्या तर दोघे गंभीररित्या जखमी झाले. ही घटना आज, १४ जून रोजी दुपारी १ वाजेदरम्यान महामार्गावरील टेंभुर्णा फाट्यानजीक घडली. ट्रकचालक फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. 


मुक्ताईनगर येथील उषा संदीप कुणबीठोक, वय २८ वर्षे ही महिला दोन मुलांसह देऊळगाव साकर्शा येथे भावाच्या घरी आली होती. आज दुपारी ही महिला भाऊ भारत श्रीराम बघे वय २४ याच्यासोबत मुलांना घेऊन दुचाकी क्रमांक एमएच २८/ एयु/ ३९४४ ने मुक्ताईनगर येथे घरी जाण्यासाठी निघाली होती. अपघातात उषा कुणबीठोक व त्यांची मुलगी जान्हवी, वय ६ वर्षे या दोघी मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. तर भारत बघे व चिमुकला गजानन कुणबीठोक वय ८ हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र, यातील भारत याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला रेफर केले. महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. 

बातम्या आणखी आहेत...