आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईपाठोपाठ मुलानेही घेतला जगाचा निरोप; वाल्मीक नगरात हळहळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर- स्थानिक स्टेशन परिसरातील वाल्मीक नगर स्थिती रहिवासी जानकीबाई रामदास बोयत यांचे वयाच्या ७७ वर्षी दीर्घ आजार मुलाच्या आजाराचे दु:ख सहन झाल्यामुळेच तिने जगाचा निरोप घेतला. त्या पाठोपाठ त्याच दिवशी मुलालासुद्धा आईच्या मृत्यूचा धक्का सहन झाल्याने त्याने ही जगाचा निरोप घेतला. ही घटना शनिवारी जानेवारीला घडली. हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. ५० वर्षीय गजानन बोयत यांची अचानक प्रकृती बिघडल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. संतोष यांना घरी आणल्यावर आई जानकीबाई यांनी मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहताच त्यांचे निधन झाले. लगेच त्याच दिवशी सायंकाळी संतोष यांचीही प्राणज्योत मालवली. 


आई आणि मुलाच्या निधनाने वाल्मीक नगरात कोणाच्याही घरी चुल पेटली नाही. जानकीबाई बोयत गजानन बोयत हे दोघेही नगर परिषदेमधून सफाई कामगार म्हणून सेवानिवृत्त झाले होते गजानन बोयत यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी, बहीण असा आप्त मोठा परिवार आहे. 

बातम्या आणखी आहेत...