आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोटमध्ये मुलाचा मृतदेह पाहताच आईने सोडला जीव, माय-लेकाचा एकत्रच अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट - मुलाच्या मृत्युचा धक्का सहन न झाल्याने आईनेही मुलापाठोपाठ प्राण त्यागल्याची हृदयद्रावक घटना अकोटात घडली. माय-लेकाचा एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आला. साश्रू नयनांनी त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला.

 

श्री शिवाजी कॉलनीमधील रहिवासी संदीप रामराव झाडे, वय ४२ वर्षे यांचे ४ फेब्रुवारी रोजी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही घटना घडल्यावर सर्वच नातेवाईकांना कळवण्यात आले. संदीप झाडे यांची ७० वर्षीय आई पंचफुला रामराव झाडे, ही त्यांच्या मुलीच्या येथे परतवाडा येथे गेली होती. त्यांना ताबडतोब अकोटला बोलावण्यात आले. मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी एकच शोक विलाप केला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला. आई व मुलावर सायंकाळी एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक संदीप झाडे हे शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत.मुलापाठोपाठ मातेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...