आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता नगर आग: पुन्हा सर्व्हेचा फार्स; आता प्रतीक्षा मदतीची...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगीमुळे घर उद््ध्वस्त झाले. मात्र पोटाची भूक तर भागवावीच लागते ना. - Divya Marathi
आगीमुळे घर उद््ध्वस्त झाले. मात्र पोटाची भूक तर भागवावीच लागते ना.

अकोला- माता नगर परिसरात गुरुवारी २२ फेब्रुवारीला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रशासनाने नुकसानीचा सर्व्हे केला. त्यात ६४ झोपड्या जळाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र शुक्रवारी २३ फेब्रुवारीला प्रशासनातर्फे नायब तहसीलदार यांची चमू सानुग्रह अनुदान वाटप करण्यासाठी गेली असता त्यांना घोळ दिसून आला. ज्यांचे नुकसान झालेच नाही, त्यांना मदत होत आहे, असा आक्षेप येथील काही नागरिकांनी घेतला. त्यानंतर प्रशासनाने त्याची पडताळणी केली असता त्यांना घोळ दिसून आला. त्यांनी मदत थांबवली व पुन्हा सर्व्हे केला. 


संघटनांची मदत 
प्रशासनाची मदत मिळाली नसली तरी अकोलेकर व काही सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना पुढे आल्या. त्यांनी माता नगरातील आग पीडितांना कपडे देऊन त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली. 


आज मिळणार यादी 
आग बाधित कुटुंबांना ५ हजार मदतीची घोषणा मनपाने केली असली तरी, सदाेष यादीमुळे मदत रखडली. शनिवारी प्रमाणित यादी महसूल विभागा कडून मिळणार अाहे. त्यानंतर ही मदत त्या कुटुंबांना देणार अाहे. 


तब्बल ३६ तासानंतर केवळ सर्व्हेच 
मातानगरात गुरुवारी २२ फेब्रुवारीला दुपारी अग्निकांड घडले. त्यानंतर शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत ३६ तास उलटले तरी जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नव्हती. गुरुवारी झालेला सर्व्हे, शुक्रवारी झालेल्या सर्व्हेत तफावत आढळली. शुक्रवारी प्रशासनाने ५७ झोपड्या जळाल्याचा निष्कर्ष काढला. गुरुवारी प्रशासनाच्या सर्व्हेत ६४ झोपड्या जळाल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...