आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदी करणाऱ्या दाढीवाले बाबांना आता 'वोट' बंदी करा -खासदार राजीव सातव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी- 'निवडणुकीआधी नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला विविध आमिष दाखवून मते पदरात पाडून घेत एक हाती सत्ता मिळवली होती.मात्र चार वर्षांचा कार्यकाळ लोटल्यानंतर एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे नोटबंदी करणाऱ्या दाढीवाल्या बाबांना आता येणाऱ्या काळात वोट बंदी करा,' अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा खासदार राजीव सातव यांनी केले. दाभडी येथे रविवारी. ८ एप्रिलला शेतकरी पदयात्रा समारोप प्रसंगी बोलत होते. 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी दि. ५ एप्रिल रोजी पांढरकवडा येथून मोदी सरकार विरोधात शेतकरी पदयात्रा काढली. दरम्यान, आज, दि. ८ एप्रिल रोजी दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरात या शेतकरी पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार राजीव सातव, माजीमंत्री शिवाजीराव मोघे, प्रमुख अतिथी म्हणून युवक काँग्रेसच्या महासचिव प्रतिभा रघुवंशी, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, माजीमंत्री वसंत पुरके, शंकर बडे, जीवन पाटील, विजय खडसे, अनिल आडे, किरण मोघे, जितेंद्र मोघे, विजय मोघे, राजीव विरखेडे, मनसेचे तिरूपती करकंदीकर, सचिन येलगंधेवार आदींची उपस्थिती होती. यावेळी खासदार राजीव सातव पुढे म्हणाले की, इंग्रजांना देशातून हाकलून लावण्यासाठी महात्मा गांधी यांनी पदयात्रा काढली होती. त्याच धर्तीवर माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मोदी सरकार विरोधात पदयात्रा काढून लोकांत चांगला संदेश दिला. दाभडी येथून नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेला मोठी स्वप्न दाखवली होती. प्रत्यक्षात मात्र, आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. राज्यात अनेक भागात रेल्वेलाईन नसतांना बुलेट ट्रेन कशासाठी आणली असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावावर फक्त झुलवत असून, तब्बल एक लाख कोटींची अदानी, टाटा, बिरला या उद्योजकांना खरी कर्जमाफी केली. मोदी सरकारने देशातील नागरिकांची फसवणूक केली. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला टिका करण्याचा अधिकार नाही. जिल्हा परिषदेमध्ये भाजपाने युती करण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे काँग्रेसने हात पूढे केला असे विचार शिवाजीराव मोघे यांनी मांडले. यावेळी राम देवसरकर, नीलेश पाटील बुटले, अतुल देशमुख, छोटू देशमुख, अमोल मांगुळकर, अशी पाटील चोंडीकर, सिन्नू आण्णा नालमवार, संजय राऊत, दिग्विजय शिंदे, निसार भाटी, सुनिल भारती, सिंकदर शाह यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निलेश नेहारे, राहूल ढोरे, संदिप गाडगे, प्रमोद पवार, कपिल ठाकरे आदी पदाधिकारी हजर होते. संचालन आरीज बेग, आभार बाळासाहेब शिंदे यांनी मानले. 


काँग्रेसच्या पदयात्रेला 'मनसे'चा पाठिंबा : मोदी सरकार विरोधात काँग्रेसने काढलेल्या शेतकरी पदयात्रेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. 

बातम्या आणखी आहेत...