आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनमध्ये बिघाड,'विदर्भ' कुरुम स्थानकावर तब्बल अडीच तास खोळंबल्याने प्रवाशांचे हाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर- मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असलेल्या मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येणाऱ्या मूर्तिजापूर-अमरावती दरम्यान असलेल्या कुरुम रेल्वेस्थानकावर मुंबई-नागपूर विदर्भ एक्स्प्रेस इंजिनमध्ये बिघाड झाल्याने गाडी अडीच तास खोळंबल्याची घटना आज, १८ जून रोजी सकाळी घडली. मालगाडीचे इंजिन लावून गाडी या स्टेशनवरून सकाळी ८ वाजून २३ मिनिटांनी पुढे रवाना करण्यात आली. या दरम्यान रेल्वे प्रवाशाांना त्रास सहन करावा लागला. या स्टेशनवर कुठलाही प्रकारची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्यापासून त्रास सहन करावा लागला. 


या घटनेने मोठी रेल्वे दुर्घटना होण्यापासून टळली. त्यानंतर या गाडीच्या पाठीमागे असलेल्या सात अतिजलद (सुपरफास्ट) रेल्वे गाड्या काढण्यात आल्या. त्यामुळे विदर्भ एक्स्प्रेस अडीच तास या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आली. यामध्ये पुणे- नागपूर, पोरबंदर - हावडा, आझाद हिंद, लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा, अहमदाबाद हावडा, अमरावती - मुंबई या गाड्यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...