आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीततज्ज्ञ गोपाळराव देशपांडे यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- येथील ख्यातनाम तबलावादक गोपाळराव रामराव देशपांडे यांचे डिसेंबर रोजी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि मोठा आप्त परिवार आहे. जुन्या पिढीतील पानसे घराण्याची तबलावादनाची परंपरा ते जोपासून होते. गोपाळरावांचे वडील कै. आबा देशपांडे प्रसिद्ध पखवाज वादक होते. त्यांचे बंधू कै. बाबा देशपांडे उत्तम हार्मोनियम वादक होते. 


अकोल्यातील तसेच बाहेरच्या ख्यातनाम गायकांची त्यांनी साथ केली होती. प्रभा अत्रे यांना साथ करण्याची संधी त्यांना मिळाली होती. अकोल्यातील सुगम संगीत गायक कै. शरद पांडे यांच्यासोबत गोपाळरावांनी अनेक मैफली गाजवल्या. त्यांचा मुलगा विवेक हाही उत्तम तबलावादक असून घराण्याचा वारसा पुढे नेत आहे. 

बातम्या आणखी आहेत...