आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: जिल्ह्यात 5073 हेक्टरवर नुकसान; बाेंडअळीची अद्याप भरपाई नाही, गारपीट मदत केव्हा मिळणार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - गारपीट, अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शनिवार, १७ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचा अादेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी महसूल, कृषी विभागासह गटवकास अधिकाऱ्यांना बजावला. पंचनामा करताना कर्जमाफीप्रमाणेच निकष लावण्यात अाल्याने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच मदत मिळणार अाहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप बाेंडअळीची नुकसान भरपाई मिळाली नसताना अाता गारपिटीची मदत केव्हा मिळणार? असा सवाल हवालदिल शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत अाहे.


दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी जिल्ह्यातील ८५ हजार ५०४ हेक्टर रब्बी क्षेत्रापैकी ५ हजार ७३ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, संत्रा, केळी, टरबूज, भाजीपाला वर्गीय पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल विभागीय अायुक्तांना पाठवला. यामध्ये वीज काेसळून तीन व्यक्तींसह दाेन मेंढ्या जखमी झाल्या असून, एक मेंढी मृत्युमुखी पडली.अकाेट तालुक्यात १५० घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे अहवालात नमूद केले अाहे.

 

जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे सातही तालुक्यांत कमी-जास्त प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी विजाही काेसळल्या हाेेत्या. अनेकांनी हरभरा साेंगून ठेवला हाेता. मात्र अचानक अालेल्या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, फळबागांचे अाताेनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करुन मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून हाेत अाहे.


बाेंडअळीची मदत रखडली, गारपीटची केव्हा मिळणार ?
बाेंडअळीने कपाशीवर हल्ला केल्याने भरपाई मिळाली नसून, अाता गारपीट व अककाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत केव्हा मिळेल, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत अाहे. बाेंड अळीने हल्ला केल्याने जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ६६८ शेतकरी अडचणीत सापडले असून, एकूण १ लाख ४३ हजार ४८०.८९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले हाेते. अाकडेवारीनुसार अपेक्षित निधीची रक्कम १३५ काेटी ५१ लाख ७४ हजार ३३९ पर्यंत पाेहाेचली. जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ६६८ शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत अाहेत.


या मुद्यांच्या आधारे होणार पंचनामे
जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या अादेशात अनेक बाबींचा उल्लेख करण्यात अाला अाहे. गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल, कृषी व ग्राम विकास विभागाकडून सर्वेक्षण करण्याचे स्थायी अादेश अाहे. त्यामुळे पुढील मुद्यांच्या अाधारे तपशीलवार अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी अादेशात स्पष्ट केले अाहे.

बातम्या आणखी आहेत...