आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएलच्या मुख्य प्रबंधकांचे कार्यालय 'सील'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - तहसील कार्यालयाने बीएसएनलाला दणका देत जागेच्या मूल्यांकनाच्या फरकाची रक्कम थकल्याने दूरसंचार विभागाच्या मुख्य प्रबंधकाचे कार्यालय साेमवारी सील केले. ८ काेटी ७९ लाख ६३ हजार ८०० रूपयांची रक्कम न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात अाली. हे कार्यालय जुना कापड बाजार परिसरात अाहे. 

 

महसूल विभागाने ४३ हजार चाैरस फुट जागा दुरसंचार विभागाच्या इमारतीसाठी उपलब्ध करून दिली हाेती. यासाठी दाेन्ही विभागात पत्रव्यवहार झाला हाेता. दूरसंचार विभागाच्या जिल्हा प्रबंधकांनी २ जून १९९९ बंदपत्रही दिले. शासन निश्चित करेल ती अंतिम किंमत निर्धारित करण्यात येईल. भरणा करण्यात आलेली तात्पुरती रक्कम व अंतिमतः निश्चित झालेली रक्कम, यातील फरकाची रक्कम (व्याजासह) शासनाला अदा करणे दूरसंचार विभागाला बंधनकारक राहील, असे नमूद केले हाेते. मात्र सहाय्यक जिल्हा निबंधकांनी सदर जागेची किंमत अाजमितीस ९ काेटी ९१ लाख ८०० रूपये निश्चित केली आहे. त्यापैकी यापूर्वी भरणा केलेली रक्कम १ काेटी ११ लाख ३७ हजार वजाकरून उर्वरित ८ काेटी ७९ लाख ६३ हजार ८०० रूपयांचा भरणा करून घेणे आवश्यक हाेते. त्यासाठी मुख्य प्रबंधकांना नाेटीस दिली होती. 


जिल्हाधिकाऱ्यांच्या अादेशाने कारवाई 
कार्यालय सील करण्याची कारवाई जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशाने तहसीलदार राजेश्वर हांडे यांच्या पथकाने केली. ही कार्यवाही तहसिलदार राजेश्वर हांडे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीदार महेंद्र आत्राम, मंडळ अधिकारी दिनेश साेनाेने, तलाठी रमेश दामाेदर, महेंद्र कदम यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...