आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१७० विहिरींवर मोटर पंप, नळ बसवणार : महापौर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला -  टंचाईच्या काळात महानगरातील अंदाजे १७० विहिरींवर मोटर पंप लावून नळ बसवण्याचा निर्णय मंगळवारी १० एप्रिलला पाणी पुरवठ्याबाबत अायाेजित आढावा व नियोजन सभेत घेतला. टंचाईच्या काळात काही विहीर व खासगी हाईड्रंट अधिग्रहीत करण्याच्या सूचना सभेत महापौरांनी दिल्या. सभेत टंचाई निवारणाचा अॅक्शन प्लॅन तयार केला. ही सभा महापाैर अग्रवाल यांनी घेतली. 

 

महान धरणात पिण्याच्या पाण्याचा अत्यल्प जलसाठा असल्याने शहरात हातपंप, सबमर्सीबल पंप व विहिरीच्या सहायाने जलपुर्तीच्या उद्देशाने हात पंप व सबमर्सीबल पंपांचा आढावा सभेत घेतला. नादुरुस्त हातपंप व सबमर्सीबल पंप दुरुस्तीची सूचना त्यांनी केली. कनिष्ठ अभियंत्यांना कामात अडथळा निर्माण होऊ नये , यासाठी टंचाईच्या काळासाठी मर्यादित मोबाइल बिल देण्याबाबत, आवश्यकतेनुसार वाहनासाठी इंधन पुरवण्याबाबत,निविदेच्या कामासाठी इंटरनेट सुविधेसाठी डोंगल पुरवण्याची सूचना महापौर अग्रवाल यांनी दिल्या. सभेला आयुक्त जितेंद्र वाघ, उपमहापौर वैशाली शेळके, 'स्थायी'चे सभापती विशाल इंगळे, सभागृह नेत्या गीतांजली शेगाेकार, जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, झोन समिती सभापती मिलिंद राऊत, अमोल गोगे, दीप मनवानी, नगरसेविका सुनीता अग्रवाल, नगरसेवक अनिल मुरुमकार, प्रभारी उपायुक्त जीतकुमार शेजव, सहा.आयुक्त डाॅ.दीपाली भोसले, क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहादूर, वासुदेव वाघाळकर, विलास शेळके, सागर शेगोकार, प्रवीण जगताप, संदीप गावंडे व जलप्रदायचे समदुरकर उपस्थित होते. 

 

अशी अाहे पाणी साठ्याची स्थिती : महान धरणात ६.७ द.ल.घ.मि. जिवंत साठा असून प्रतिमाह २.२५ द.ल.घ.मिमीची उचल करण्यात येते. प्रतिमाह १ द.ल.घ.मि. चे बाष्पीभवन होते. उपलब्ध जलसाठा तीन महिने पुरेल. त्यानंतर धरणात पावसाच्या पाण्याचा संचय न झाल्यास ५ द.ल.घ.मि. मृत साठ्यातून दोन महिने पुरवठा होऊ शकेल. 


२७८२ हातपंप व ७८३ सबमर्सिबल सुस्थितीत 
मनपा क्षेत्रात ३५०७ हातपंप , ९७१ सबमर्सिबल पंप आहेत. यामधून २७८२ हातपंप व ७८३ सबमर्सीबल सुस्थितीत आहेत. टंचाईच्या काळात शहरातील काही विहीर व खासगी हाईड्रंट अधिग्रहणाच्या सूचना दिल्या. या वेळी महापौर अग्रवाल यांनी खासदार, आमदार निधी व मनपा निधीतून या कामासाठी निधी कमी पडणार नाही, याची ग्वाही दिली. टंचाईच्या काळात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यांतर्गत कामे करणार असल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...