आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न सांगता दांडी; तर लागेल बिनपगारी रजा, मनपा यंत्रणेला शिस्त लागवण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेत गेल्या काही महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा न सांगता दांडी मारण्याच्या सवयीला आता लगाम लागणार आहे. सतत तीन दिवस दहा मिनिटे उशिराने आल्यास एका किरकोळ रजेची कपात केली जाणार आहे. तसेच न सांगता दांडी मारल्यास एक दिवसाची बिनपगारी रजा करण्यात येणार आहे. आयुक्त जितेंद्र वाघ यांनी या अनुषंगाने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

 

महापालिकेचे कामकाज एकूण ३२ विभागात चालते. यापैकी काही कार्यालये ही महापालिका मुख्य कार्यालयाच्या बाहेर आहेत. महापालिकेत एकूण जवळपास २२०० कर्मचारी कार्यरत आहेत. नियमानुसार महापालिका कार्यालय पावणे दहा वाजता सुरु होऊन साडेसहा पर्यंत उघडे राहायला पाहिजे. या दरम्यान कार्यालय उघडले जाते. मात्र कर्मचाऱ्यांचा कार्यालयात येणारा वेळ मात्र मर्जीनुसार आहे. साधारणपणे अकरा ते साडेअकरा पर्यंत कर्मचारी कर्तव्यावर हजर होतात. गेल्या अनेक महिन्यापासून हा प्रकार सुरु आहे. ही बाब आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच महापालिकेतील विविध कार्यालयात जावून कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत अनेक कर्मचारी कर्तव्यावर हजर नसल्याचे त्यांना आढळून आले. या प्रकारामुळे कामकाजावर परिणाम होतो, ही बाब लक्षात आल्या नंतर त्यांनी ३१ ऑगस्ट १९८८ च्या शासना निर्णयाच्या आधारेच परिपत्रक प्रसिद्ध केले.

 

बातम्या आणखी आहेत...