आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता दंड अभय योजना जाहीर, 31 जुलैची मुदत, शहरातील मालमत्ता धारकांना दिलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - मनपाने थकीत मालमत्ता धारकांसाठी दंड (शास्ती ) अभय याेजना जाहीर केली अाहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत थकीत कराच्या रकमेचा भरणा केल्यास शास्तीची (दंडाची ) रक्कम पूर्णतः माफ करण्यात येणार अाहे.

 

२०१७-१८ ते २०२१-२२ या पंच वार्षिक करमुल्यनिर्धारणाचे संगणकीकृत चालू मागणीचे देयके मालमत्ता धारकांना देण्यात येत आहेत. ही कार्यवाही करताना २०१७-१८ पर्यंत बऱ्याच मालमत्तांवर थकीत कर बाकी असल्याचे निदर्शनास आले. अशा थकबाकी मालमत्ता धारकांकडून नियमानुसार रकमेची शास्तीसह (दंडासह) वसुली करणे आवश्यक अाहे. महानगरपालिका क्षेत्रात नव्याने आधुनिक जी.आय.एस. पद्धतीने मालमत्तांची कर आकारणी करुन देयके वितरीत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मागील आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करात सुधारणा व दर वाढ केली करण्यात अाली. सन २०१७-१८ पर्यंतच्या थकीत मालमत्ता करावर शास्ती लागत असल्यामुळे शास्ती माफ करण्याची मागणी सर्वच स्तरावरून झाली. याबाबत महापौर विजय अग्रवाल यांना वेळोवेळी निवेदनही सादर केले गेले. त्यानुसार अभय याेजना राबवण्याबाबत आयुक्तांना प़त्राव्दारे कळवण्यात अाले. त्यामुळे आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अादेशाने शास्ती अभय योजनेची घाेषणा करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...