आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटबाजी टाळा;एकहाती सत्ता मिळवा! प्रदेश कार्यकारिणीचा सत्कार साेहळा थाटात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - भारिप-बमसंच्या प्रदेश कार्यकारिणीचा सत्कार व विविध कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा साेहळा साेमवारी अशोक वाटिका येथे थाटात पार पडला. जिल्ह्यात गटबाजीची चर्चा माेठ्या प्रमाणात सुरु असून, ही चर्चा बंद हाेणे अावश्यक अाहे. कार्यकर्त्यांनी प्रचारक म्हणून सक्रिय होऊन अागामी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी काेणाच्याही कुबड्या घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.निवडणुकीत नकारात्मक वातावरण तयार हाेणार नाही, याची काळजी घ्या, अशा शब्दात प्रदेशपातळीवरील नेत्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे कान टाेचले. अागामी सर्व निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारिप-बमसंने रणनिती अाखण्यास सुरुवात केली असून, त्याचपृष्ठभूमीवर प्रदेश पातळीवरील नेत्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना समज दिल्याची चर्चा कार्यक्रम स्थळी सुरू हाेती. 

 

पक्ष प्रवेश व सत्कार साेहळा भारिप-बमसं, महिला अाघाडी अाणि सम्यक विद्यार्थी अांदाेलनातर्फे अायाेजित करण्यात अाला होता. साेहळ्याच्या अध्यक्षस्थानी डि.एन. खंडारे हाेते. विचारपीठावर महासचिव अमित भुईगळ, प्रा. सुरेश शेळके, कुशल मेश्राम, सल्लागार डाॅ. डी. एम. भांडे, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघाेडे, उपाध्यक्ष जमीर उल्लाखान अादी प्रामुख्याने उपस्थित हाेते. 
राजकारणात चढाअाेढ ही सुरुच राहते, अशा शब्दात डि.एन. खंडारे यांनी पक्षातील गटबाजीवर भाष्य केले. प्रदेश कार्यकारिणीने परवानगी दिल्यास युवक अाघाडी पुन्हा स्थापन करता येईल, असेही खंडारे यांनी नमूद केले. दिनकर वाघ, प्रतिभा अवचार यांनी मनाेगत व्यक्त केले. प्रदेश कार्यकारिणीत अकाेल्यातील तीन नेत्यांना समावेश असणे हा सुवर्ण याेग असल्याचे मत प्रास्तविकात गजानन गवई यांनी व्यक्त केले. संचालन राजेंद्र पाताेडे यांनी केले. 


जिल्ह्यातील नेते हाेते हजर:साेहळ्यासाठी भारिप-बमसंचे जिल्ह्यातील नेत्यांच्या बसण्यासाठी विचारपीठाच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था करण्यात अाली हाेती. साेहळ्यात प्रामुख्याने अकाेट येथील दीपक रामदास बाेडखे, अरुंद्धती शिरसाट, सभापती रेखा अंभाेरे, देवकाबाई पाताेंड, अासिफ खान, हरिभाऊ वाघाेडे, ज्ञानेश्वर सुलताने, शेख साबिर, प्रसिद्धी प्रमुख प्रसन्नजित गवई, बालमुकुंद भिरड, दामाेदर जगताप, सम्राट सुरवाडे, पराग गवई, बुद्धरत्न इंगाले, प्रदीप वानखडे, मनाेहर पंजवाणी, प्रभा शिरसाट, प्रा. मंताेष माेहाेड, वंदना वासनिक, किरण बाेराखडे, अशाेक शिरसाट, गाैतम शिरसाट, श्रीकांत ढगेकर, अादी उपस्थित हाेते. 

 

यांचा झाला सत्कार: साेहळ्यात प्रदेशाध्यक्ष अशाेक साेनाेने, महासचिव अमित भुईगळ, प्रा. सुरेश शेळके, कुशल मेश्राम, सल्लागार डाॅ. डी. एम. भांडे, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांचा सत्कार करण्यात अाला. याप्रसंगी शाहीर लुकमान ताज यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम झाला. 
कष्टाचे पैसे हारतुऱ्यावर नष्ट करु नका: कष्टाचे पैसे नष्ट करु नका, असा सल्ला देत यानंतर हार- शाल स्वीकारण्यात येणार नाहीत, असे भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशाेक साेनाेने यांनी जाहीर केले. संयाेजन समितीतर्फे तीन वेळा प्रदेश कार्यकारिणीचा सत्कार करण्यात अाला. प्रत्येक तालुका कार्यकारिणीतर्फे सत्कार झाला. अकाेट येथील दीपक रामदास बाेडखे यांनीही कार्यर्त्यांसह प्रदेश कार्यकारिणीचा सत्कार केला. 


महिलाच्या कार्यक्रमात पुरुषांना प्रवेश नाही 
भारिप-बमसं महिला अाघाडीच्या कार्यक्रमात विचारपीठावर पुरुषांना प्रवेश दिला जाणार. सम्यक विद्यार्थी अांदाेलनासारख्या अनेक विग्स, अाघाड्यांमध्ये हस्तक्षेप हाेऊ दिला जाणार नाही. मला अकाेल्यातून निवडणूक लढवायची नसून, मी काेणाला घाबरतही नाही, असे प्रदेशाध्यक्ष अशाेक साेनाेने यांनी जाहीर केले. एकाने फाेनवरुन सूचक इशारा दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. 


भारिप-बमसंच्या प्रदेश कार्यकारिणीचा सत्कार व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा सोमवारी अशोक वाटिकाजवळ पार पडला. यावेळी अकाेटचे दीपक रामदास बाेडखे यांनीही कार्यकर्त्यांसह प्रदेश कार्यकारिणीचा सत्कार केला. 


काेण काय म्हणाले ? 
शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट: शेळके 
अकाेला पॅटर्नकडून राज्याला उर्जा मिळत असून, अॅड. बाळासाहेब अांबेडकर यांच्या नेतृत्वात बहुजन एकवटणार असल्याचे मत प्रा. सुरेश शेळके यांनी व्यक्त केले. सरकारकडून शिक्षण व्यवस्था डळमळीत करण्यात येत असून , शिष्यवृत्तीपासून अर्थात शिक्षणापासूनच माेठ्या समाजघटकाला वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा अाराेप शेळके यांनी केला. 


प्रदेश कार्यकारिणी लावेल शिस्त : मेश्राम 
गटबाजीची चर्चा बंद हाेणे अावश्यक असून, प्रदेश कार्यकारिणी शिस्त लावल्याशिवाय राहणार नाही, असे कुशल मेश्राम म्हणाले. सत्तेत असल्याने शिस्तीत वागणे अावश्यक अाहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सत्ता असतानाही बाळासाहेब अांबेडकर लाेकसभेत पाेहाेचत नाहीत, याची खंत वाटते, असेही ते म्हणाले. 


युवकांची फळी तयार करा : अमित भुईगळ 
जिल्ह्यात युवक व महिलांनी फळी तयार करा, असे अावाहन अमित भुईगळ यांनी केले. अकाेला हा गड असतानाही लाेकसभेत बाळासाहेब अांबेडकर यांचा पराभव का हाेताे, प्रतिस्पर्धी उमेदवाराचे वस्त्रहरण करण्यात अापण कुठे कमी पडताे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

बातम्या आणखी आहेत...