आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद सीइओंच्या गैरहजेरीचा दिशा समिती बैठकीला फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)ची शुक्रवार २३ फेब्रुवारीची बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनुपस्थित असल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याचे समिती अध्यक्ष, खासदार संजय धोत्रे यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. 


केंद्र शासन पुरस्कृत लोकाभिमुख योजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थितही झाले. परंतु सीईओ नाहीत म्हणून बैठक घेण्यात काही हशील नाही, असा सूर उमटल्यामुळे ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आली. तसे पाहता या बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे (डीआरडीए) प्रकल्प संचालक डॉ. सुभाष पवार उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते. 


खासदारांच्या सोयीने लवकरच बैठक 
जिल्हाधिकारी पदसिद्ध सचिव असल्याने मी वाशीमला गेलो होतो. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनाही परगावी जावे लागले. त्यामुळे आजची बैठक रद्द केली. त्याचे स्पष्टीकरण मी खासदार धोत्रे यांना पाठवले आहे. सोईनुसार ते नवी तारीख ठरवतील.
- एस. रामामूर्ती, सीईओ, जि.प. अकोला. 


नवी तारीख लवकरच ठरवू 
जिल्हाधिकाऱ्यांना परगावी जावे लागले, हे संयुक्तिक आहे. त्यामुळे जि. प.चे सीईआे या बैठकीला असणे गरजेचे होते. परंतु तेही नसल्यानेे आजची बैठक रद्द केली. दरम्यान सर्व विभागप्रमुख आणि संबंधितांशी बोलणी करून नवी तारीख लवकरच ठरवली जाईल.
- संजय धोत्रे, खासदार, अकोला. 

बातम्या आणखी आहेत...