आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्ष, संचालकांचे खाते 'सील'; बाळापूर नागरी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - बाळापूर येथील नागरी पतसंस्थेत कोट्यवधीच्या रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अॅड. नातिकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालकांची २२ बॅक खाते आर्थिक गुन्हे शाखेेने सील केली आहेत. महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझीटर्स (इन फायनांसीयल एस्टाब्लीशमेंट) अॅक्ट (एमपीआडी अॅक्ट) १९९९ च्या कलम ४ नुसार आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पतसंस्थेच्या संचालकांचे बँक खाते सील करण्याची सूचना संबंधीत बँकांना अार्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली अाहे. महानिबंधक, पुणे यांना पत्र पाठवून सर्व संचालकांच्या नावावर असलेल्या संपत्तीवर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यावर प्रतिबंध घालावा, अशा सूचना केल्याने फरार संचालकांचे धाबे दणाणले आहे.

 

पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. नातिकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालक या प्रकरणात फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. संचालक मंडळाच्या संपत्तीवर टाच आणल्याने ठेवीदरांना काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे. त्यातून वसुलीचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रूपयांचा घोटाळा उघडकीस आला असून, गुन्हे दाखल होताच पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. सैय्यद नतिकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालक फरार झाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्थेची चौकशी करून बँकेचे सर्व दस्तावेज ताब्यात घेऊन बँकेला कुलूप ठोकल्याने ७०० ठेवीदारांचा जीव आता टांगणीला लागला आहे.


बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेत सातशे ठेवीदारांनी गुंतवणूक केली आहे. माजी आमदार खतीब हे या पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. ठेवीदारांनी आकर्षक व्याजदराच्या आमिषाला बळी पडून ठेवी ठेवल्या होत्या. गुंतवणुकदारांच्या ठेवींचा वापर अध्यक्षांसह संचालकांनी दुसऱ्याच्या नावाने परस्पर कर्ज वितरीत करून दुरूपयोग केल्याचा आरोप तक्रारदार रामदास श्रीराम पराते यांनी केला आहे. गुन्हे दाखल होताच माजी आमदार तथा पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. सै. नातिकोद्दीन सै. हुसामोमद्दीन खतीब, शाम सखाराम शेगोकार, रजीया बेगम सै. नातीकोद्दीन खतीब, सै. हमिद्दोनी सै. जमीदोद्दीन, नंदकिशोर दामोधर पंचभाई, मो. हनीफ अब्दुल मुनाफ, निजामोद्दीन शफीद्दीन , गफारली रेहमानजी रंगारी, सै. मुजीबुर रहेमान सै. हबीब, निर्मलाताई श्रीकृष्ण उमाळे, शे. महेमूद शे. हसन, शे. मुनीर शेख व शेख वजीर, शेख इब्राहीम हे पदाधिकारी व संचालक फरार झाले आहेत. या प्रकरणाचा तपास अार्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी किसन गावित यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हेचे पोलिस निरीक्षक गणेश अणे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...